शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज आज प्रात्यक्षिक : १६ मे रोजी दुपारपर्यंत निकाल स्पष्ट

By admin | Updated: May 9, 2014 00:28 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख जवळ येईल, तशी जिल्हा प्रशासनाची तयारी वेग घेत आहे. मतमोजणीची तयारी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख जवळ येईल, तशी जिल्हा प्रशासनाची तयारी वेग घेत आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण होत आली असून, १६ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांनी व्यक्त केली. दरम्यान, उद्या (शुक्रवार) प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १६ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीचे कागदोपत्री नियोजन पूर्ण झाले असून, आता फक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण व रंगीत तालीम बाकी राहिली आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबले लावली जाणार आहेत. म्हणजेच एकूण १६८ टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होईल. त्या हिशेबाने प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी याप्रमाणे ५०४ क र्मचारी या प्रक्रियेत भाग घेतील. मतमोजणीच्या कमीत कमी २४, तर जास्तीत जास्त २९ फेर्‍या होणार आहेत. एक फेरी ही दहा ते बारा हजारांची असणार आहे. पहिल्या टप्प्यात टपालाने येणार्‍या मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीपर्यंत ज्या मतपत्रिका येतील, त्या मोजण्यात येणार आहेत. या मतपत्रिका मोजल्यानंतर मग इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे खोलली जातील. एका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर साधारण एक हजार ते बाराशे मतदान गृहीत धरण्यात आले आहे. पोस्टाने येणार्‍या मतपत्रिकांचे विभाजन करणे आणि मोजणी करणे याला उशीर होणार असल्याने निकाल हा दुपारी तीन वाजेपर्यंत लागेल.