शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदार नोंदणीविरोधात यंत्रणा ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:02 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होण्याची शक्यता आहे. ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागल्याने निवडणूक विभागाकडून दक्षता घेण्यात आली आहे. यामुळे नव्याने नोंदणीसाठी येणाऱ्या अर्जांची यादी उपलब्ध करून दिली जाणार असून, यातील नावांवर आक्षेप घेतल्यानंतर ती नावे रद्द केली जाणार आहेत. यासाठी यंदा प्रथमच हरकत घेण्यासाठी मतदारांना अर्र्ज नं. ७ द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक ३९ हजार मतदारांची नावे ही मृत, दुबार, स्थलांतरित अशा कारणास्तव वगळण्यात आली. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये मतदारयादीत नाव नोंदणी, वगळणी, दुरुस्ती केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली असली, तरी विधानसभा निवडणूक जवळपास सर्वच मतदारसंघांत चुरशीने होणार आहे; त्यामुळे बोगस मतदारांची नोंदणीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. याची कुणकुण निवडणूक विभागाला लागली आहे.पूर्वी नोंदणीचे फॉर्म निवडणूक कार्यालयांमध्ये जमा केले जात होते; त्यामुळे त्याचे पुरावे पाहणे निवडणूक विभागाला शक्य होते. यातील एखादे नाव आक्षेपार्ह आढळल्यास किंवा पुरावे नसल्यास ती नावे तत्काळ कमी केली जात होती. निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या अधिकारात ही कार्यवाही करू शकत होते; परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारयादीतील नावे स्वत:हून रद्द करायची नाहीत, असे निर्देशआहेत.संभाव्य बोगस किंवा आक्षेपार्ह नावांचा शोध घेण्यासाठी आॅनलाईनद्वारे नोंदणी झालेल्या फॉर्मची यादी सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये एखाद्या नावाबद्दल हरकत असेल, तर संबंधितांनी अर्ज नं. ७ भरून दिल्यानंतर त्याची शहानिशा करून ते नाव रद्द केले जाणार आहे.नोंदणी अर्जांची यादी घेण्याचे आवाहनमतदार नोंदणी मोहिमेत निवडणूक विभागाकडे आलेल्या अर्जांची यादी ज्यांना पाहिजे आहे, त्यांनी ताब्यात घ्यावी. यामधील नावांवर काय हरकत असल्यास ती अर्ज. नं. ७ द्वारे सादर करावी, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.आॅनलाईन नोंदणीवर नजरमतदार नोंदणीसाठी ‘एनव्हीएसपी’ या प्रणालीद्वारे आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; त्यामुळे निवडणूक विभागाकडे येऊन थेट अर्ज देण्याचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामी आॅनलाईनमुळे बोगस मतदार नोंदणीची दाट शक्यता आहे. हे गृहीत धरूनच आॅनलाईन नोंदणीवरही निवडणूक विभागाची बारकाईने नजर राहणार आहे.