शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली मेख

By admin | Updated: July 6, 2015 00:28 IST

मच्छिंद्र सकटे : दलित महासंघाचा मेळाव्यात मोदी, फडणवीस सरकारवर टीका

कोल्हापूर : ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’च्या नावाखाली मोदी आणि फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या हितालाच मेख मारली आहे. आज हिंदू राष्ट्रवादामुळे शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मागे पडले आहेत. दलितांवरील अत्याचार वाढल्यामुळे हिंदू राष्ट्रवादाला रोखण्यासाठी दलित महासंघाने तीव्र संघर्षाचा निर्धार केल्याचे महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.दलित महासंघाच्या २४ व्या वर्धापनदिनी रविवारी येथील शाहू स्मारक भवनात निर्धार मेळाव्यात अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी भटक्या-विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने उपस्थित होते.डॉ. सकटे म्हणाले, आरएसएस आजही आपले कर्मठ विचार सोडायला तयार नाही. स्वत:मध्ये बदल घडवून न आणणाऱ्यांचे सरकार देशामध्ये कसे बदल घडविणार? गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गोरगरिबांचे आर्थिक नुकसान होत आहे. मराठ्यांना व मुस्लिमांना आरक्षणापासून डावलले जात आहे; पण याविरोधात कुणीच काही बोलत नाहीत. पूर्वी लोक अडाणी, अंधश्रद्धाळू व गरीब होते; पण ते नेता चांगला निवडत होते. आज लोक सुशिक्षित झाले पण नेता अडाणी, अशी परिस्थिती आहे. शाहू-फुले-आंबेडकर आणि अण्णा भाऊंचे विचार ही आमची शिदोरी असल्याचे डॉ. सकटे यांनी सांगितले.लक्ष्मण माने म्हणाले, गरीबांच्या संघटना बांधणे आज कठीण झाले आहे. कार्यकर्तेच दलाल झाल्यामुळे पुरोगामी चळवळ धोक्यात आहे. आमिषापोटी तरुणांना वेगळ्या वाटेवर नेले जात आहे. हे रोखण्यासाठी तरुणांना चळवळीत संधी दिली पाहिजे. दलित संघटनांनी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवरही लढावे. प्रतिगामी शक्तींची सत्ता केंद्रात असल्यामुळे पुरोगामी गटातील सर्व जातिसमूहांनी एकत्रित येऊन लढा उभारला तरच टिकाव लागणार आहे. डॉ. गुरव म्हणाले, आपण अहंकार सोडत नाही तोपर्यंत जातिव्यवस्था तशीच राहील. जातियवादी ‘आरएसएस’चा लोकशाही मार्गाने पराभव करण्यासाठी पुढे या. सर्वजण एकत्र आले तर या प्रतिगाम्यांची सत्ता उलथवून टाकणे अशक्य नाही. दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा, अनारोग्य, व्यसन संपले तरच बहुजनांची प्रगती होईल. जिल्हाध्यक्ष लालासो नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दबडे, बाबूराव आयवाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पुष्पलता सकटे, अनिल मिसाळ, अजित भोरे, सुरेश महापुरे, आदी उपस्थित होते. प्रा. अमोल महापुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आठवले यांच्याकडून दलित कविता बदनाम दलित कविता रामदास आठवलेंनी बदनाम केली. ल ला ल आणि ट ला ट जुळवून संसदेत कविता करण्याची काय गरज आहे? अशा वृत्तीमुळे आंबेडकरी चळवळ पुढे जाणार नाही. आंबेडकरवादी चळवळीत काम करताना अशा पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे आहे, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली.गुडसा आंदोलन गोवंश हत्याबंदी कायदा करून फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या तोंडचा घासच काढून घेतला आहे. याला विरोध करण्यासाठी दलित महासंघातर्फे गुडसा आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. सकटे यांनी दिला.