शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे उद्योगांना झुकते माप

By admin | Updated: October 2, 2015 01:25 IST

उल्का महाजन : के. ब. जगदाळे जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान

कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्ने दाखवीत सर्वसामान्यांची मते मिळवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्ताधारी झाल्यावर मात्र आपले खरे रूप दाखविले आहे. आधीच्या सरकारने केलेल्या कायद्यातील शेतकरी हिताच्या तरतुदी बदलून नव्या कायद्यात उद्योगांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसते. मोदी सरकारचे इमान सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांशी नव्हे, तर उद्योगपतींशी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी व्यक्त केले. शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी ‘आम्ही भारतीय लोकआंदोलन’तर्फे कै. के. ब. जगदाळे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘केंद्र सरकारची विकासनीती आणि आपण’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पोवार-पाटील होते. महाजन यांनी आपल्या भाषणाची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना श्रद्धांजली वाहून केली. यावेळी त्या म्हणाल्या, निवडणुकीपूर्वी मोदींची प्रतिमा ‘विकासपुरुष’ अशी करण्यात आली होती. मात्र, निवडणुकीनंतर त्यांची प्रतिमा पूर्णपणे उलटी दिसत आहे. मोदी ज्या योजनांचा जयघोष करीत आहेत, त्या स्मार्ट सिटी, औद्योगिक कॉरिडॉर, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग झोन यासारख्या प्रकल्पांना प्रचंड जमीन लागणार आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी भूसंपादन चालू आहे. या प्रकल्पाचे प्रभावित क्षेत्र आहे ४ लाख ३६ हजार ४८६ चौरस किलोमीटर. हे संपूर्ण संपादित होणार नसले, तरी यामध्ये किमान ३ लाख ९० हजार हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. असे आणखी तीन कॉरिडॉर होऊ घातले आहेत, ज्यांत अमृतसर-कोलकाता, मुंबई-बंगलोर, चेन्नई-बंगलोर यांचा समावेश आहे. मोदींना आणखी १९ कॉरिडॉर करायचे आहेत. यामध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त जमीन जाणार आहे. त्यांना लागणारे पाणी, वीज, रेती, माती, दगड यासाठी तसेच सहापदरी, आठपदरी रस्ते यामध्ये जमिनी जाणार आहेत. या नव्या व्यवस्थेत ग्रामीण कारागीर, शेतमजूर त्यांच्या घरातील पुढील पिढी यांना काय स्थान असेल, सामान्य जनतेच्या अन्नसुरक्षेचे भवितव्य काय, या प्रश्नांची उत्तरे देण्यास मात्र सरकार अनुत्तरित असल्याचे महाजन यांनी सांगितले.महाजन म्हणाल्या, एकीकडे कामगारांची पिळवणूक करण्यासाठी भांडवलदारांना पोषक वातावरण निर्माण केले जात आहे. असंघटित लोकांनाच कायद्याचा धाक दाखवून लुबाडण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. हे समाजवादाला मारक असून याविरुद्ध जनमत तयार करण्याची गरज आहे. याप्रसंगी अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहनिमंत्रक चंद्रकांत यादव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी व्यासपीठावर ‘आम्ही भारतीय’चे मुख्य प्रवर्तक बाळ पोतदार, सहनिमंत्रक संभाजीराव जगदाळे, माजी महापौर शिवाजीराव कदम, उषा शिंदे होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)