शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी करणार उपाययोजना

By admin | Updated: September 12, 2015 00:51 IST

देवस्थानच्या बैठकीत निर्णय : विद्यापीठाचे घेणार सहकार्य

कोल्हापूर : बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नांनंतर करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन करण्यात आले आहे. हे संवर्धन दीर्घकाळ टिकावे यासाठी पुरातत्त्व खात्याने दिलेल्या सूचना अमलात आणण्यासाठी देवस्थान समिती आता शिवाजी विद्यापीठाची मदत घेणार आहे. गाभाऱ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा करून विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. आॅगस्ट महिन्यात केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीचे नैसर्गिक साधनांद्वारे संवर्धन केले आहे. मात्र, हे संवर्धन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांनी काही मार्गदर्शक सूचना देवस्थान समिती आणि श्रीपूजकांना दिल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांची अंमलबजावणी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देवस्थानच्या जुन्या बलभीम बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी होते. देवस्थानच्या ठेवींची विविध खाती आहेत त्यात सुसूत्रता आणण्याच्या सूचना ‘आयसीआयसीआय’च्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या तसेच देवस्थान समितीच्या अनेक जागा आहे त्यांचा विकास करण्यावरही चर्चा झाली. (प्रतिनिधी)नाग चिन्हावर चर्चा नाहीच...या बैठकीत नाग चिन्हासंबंधी चर्चा झालीच नाही. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, नाग चिन्हासंबंधी पुरातत्त्व खात्याप्रमाणेच श्रीपूजकांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांच्यावतीने उत्तर आले की यावर निर्णय घेण्यात येईल.