शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘एम.डी.’विनाच कारखान्याचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:49 IST

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सह. साखर कारखान्यात संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संचालक नाहीत, तर जानेवारीतील एम.डी.चा मुदतवाढ प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्याने दीड महिना कारखाना एम.डी.विनाच आहे.

ठळक मुद्दे बिद्री साखर कारखाना : चूक प्रशासनाची, शिक्षा निर्दोषाला, निवडणुकीमुळे कर्मचारी वर्गाची धांदलदोन वर्षांत अन्य पदांवर जाहिरात काढून भरती करण्यात आली.दुसरीकडे कारखान्याकडून सहसंचालक कार्यालयात कागदपत्रांची देवाण-घेवाण वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सह. साखर कारखान्यात संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संचालक नाहीत, तर जानेवारीतील एम.डी.चा मुदतवाढ प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्याने दीड महिना कारखाना एम.डी.विनाच आहे. ‘चूक एकाची दंड दुसºयाला’ असे झाले असून, निवडणूक धामधुमीत कर्मचाºयांची धांदल उडत आहे.

बिद्री साखर कारखान्याच्या वाढीव सभासदांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात होता. त्याच दरम्यान विरोधक आमदार प्रकाशराव आबिटकर, दिनकरराव जाधव, आदी मंडळींनी संचालक मंडळाची मुदत संपल्याने ते बरखास्त करावे, अशी मागणी केली. डिसेंबर २०१५ ला संचालक मंडळ बरखास्त झाले. प्रशासकीय कार्यभार सुरू झाला, तर रेंगाळलेली सभासद छाननीही नुकतीच पूर्ण झाली असून, निवडणुकीची धामधूम सुरू झाली. एकीकडे कारखाना कार्यक्षेत्रात चार तालुक्यांतील राजकीय वातावरण तापू लागले, तर दुसरीकडे कारखान्याकडून सहसंचालक कार्यालयात कागदपत्रांची देवाण-घेवाण वाढली आणि एम.डी.यांचे कारखान्यात येणे बंद झाले.

१९ जानेवारी २०१७ ला कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई सेवानिवृत्त होत होते. त्याचवेळी ३१ जानेवारीला प्रशासकीय मंडळाच्या मिंटिगमध्ये एम.डीं.ना मुदतवाढीचा प्रस्ताव केला. त्यानंतर परत १६ जून २०१७ ला तीन महिन्यांचा वाढीव प्रस्ताव पाठविला. मात्र, प्रस्ताव सहकार विभागाकडे वेळेत न मिळाल्याने त्या विभागाने २३ जून २०१७ ला एम.डीं.ना सेवानिवृत्तीनंतर कारभार केल्याने पगार वसूल करून घेण्यासाठी नोटीस पाठविली.

ही नोटीस मिळाल्यापासून कारखान्यात एम.डीं.नी येणे बंद केले. त्यामुळे गेले दीड महिना कारखान्याचा कारभार एम.डीं.विनाच आहे. सध्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार कारखान्याचे सचिव एस. जी. किल्लेदार पाहत आहेत.प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातून एम.डीं.चा मुदतवाढ प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविण्यास विलंब झाला. मात्र, याबाबत संबंधित विभागावर कोणतीच कार्यवाही न करता कारखान्याच्या एम.डीं.ना नोटीस पाठविणे म्हणजे ‘चूक एकाची आणि दंड दुसºयाला’ अशी अवस्था झाली आहे.हमिदवाड्यात एक, बिद्रीत दुसरेचकारखाना कार्यकारी संचालकपदावर नेमणूक व्हावी, यासाठी शासनाने यापूर्वी घेतलेल्या परीक्षेत जिल्ह्यातील हमिदवाडा साखर कारखान्याचे एन. एस. पाटील व बिद्री साखर कारखान्याचे धनंजय देसाई हे दोघे उत्तीर्ण झाले.त्यापैकी पाटील यांची हमिदवाड्याच्या एम.डी.पदी नियुक्ती झाली. मात्र, बिद्रीत पॅनेलवरील उमेदवार डावलून प्रभारी उमेदवार देण्यासाठी लॉबिंग झाल्याची चर्चा आहे. कोणत्याही राजकीय गटाची सता नसताना व कारखान्याची सूत्रे कर्तृत्वदक्ष अधिकारी पाहत आहेत, तरीही पॅनेलवरील उमेदवार डावलून प्रभारीची चर्चा रंगली आहे. या दोन वर्षांत अन्य पदांवर जाहिरात काढून भरती करण्यात आली. मात्र, एम.डीं.बाबत कुठे घोडे अडले ? याची चर्चा आहे.