शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

मयूरवाहिनी, शैलपुत्री, त्रिपूरसुंदरी

By admin | Updated: September 29, 2016 00:33 IST

नवरात्रौत्सवात अंबाबाईची रूपे : पूजेतून पुराणकाळाची अनुभूती मिळणार

कोल्हापूर : आदिशक्ती महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेली करवीरनिवासिनी अंबाबाई यंदाच्या नवरात्रौत्सवात मयूरवाहिनी, शैलपुत्री, त्रिपूरसुंदरी, गायत्रीदेवी अशा दुर्गेच्या विविध रूपांत दिसणार आहे. जुन्या जाणत्या श्रीपूजकांकडून १९८० ते ९० च्या दशकात अशा प्रकारच्या पूजा बांधण्यात आल्या होत्या. नवरात्रौत्सवातील दिवसात करवीरनिवासिनी अंबाबाईची रोज एका दुर्गेच्या रूपात पूजा बांधली जाते. जडावाच्या अलंकारांनी बांधल्या जाणाऱ्या या पूजा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या पूजा बांधण्यासाठी नवरात्रौत्सवात वार आलेल्या श्रीपूजकांना सहा महिने आधीपासून तयारी करावी लागते. या पूजा बांधणे ही देखील एक कला आहे, जी गेल्या ५६ पिढ्यांपासून श्रीपूजकांनी साधली आहे. यंदाच्या नवरात्रातील पहिले पाच दिवस दिवाकर ठाणेकर यांचा वार आहे. पुढील सहा दिवस संजय मुनिश्वर यांच्याकडे आले आहे. दोन्ही श्रीपूजकांच्यावतीने यंदा १९८० ते ९० च्या दशकातील पूजा बांधण्यात येणार आहेत. गेल्या पाच वर्षांत पुराण कथेतील एक विशिष्ट थीम घेऊन किंवा भारतासह अन्य देशांत असलेल्या शक्तिपीठांच्या इतिहासावर आधारित पूजा बांधल्या जात आहे. मात्र, पूर्वी ही सोय नव्हती. त्यामुळे उपलब्ध पौराणिक ग्रंथांमधील कथांनुरूप पूजा बांधल्या जात होत्या. त्या काळातील पूजांची अनुभूती यंदा भक्तांना मिळणार आहे. यंदा नवरात्रौत्सव ११ दिवसांचा आहे. हे दिवस आणि बांधल्या जाणाऱ्या पूजांचे वैशिष्ट्य खास वाचकांसाठी..उत्सवकाळातील देवीच्या पूजांचे विस्तृत नियोजनशुक्रवार (दि.३०) : जडावाच्या दागिन्यांची खडी पूजा. शनिवार (दि.१ आॅक्टोबर) : सिंहासनारूढ अंबाबाई : हा घटस्थापनेचा दिवस. या दिवशी देवी भक्तांच्या उपासना स्वीकारत सिंहासनावर विराजमान होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. घटस्थापनेच्या विधीला ‘देवी बसली’, असे संबोधले जाते. रविवार (दि. २) मयूरवाहिनी : नवशक्ती देवतांमधील एकशक्ती देवता. सोमवार (दि. ३) शैलपूत्री पूजा : नवदुर्गामधील व नवरात्रामधील प्रथम देवता. मंगळवार (दि. ४): सिंहवाहिनी : महाभयांचा नाश करणारी व भक्तांचे रक्षण करणारी देवता बुधवार (दि. ५) : गरूडवाहिनी : कोल्लासूर दैत्यास भय निर्माण करणारी देवी. गुरुवार (दि. ६) : गजारूढ : यादिवशी अंबाबाई लव्याजम्यानिशी आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीस जाते. शुक्रवार (दि. ७) : महात्रिपूरसुंदरी : दशमहा विद्येतील लोकप्रिय देवी. शनिवार (दि. ८) : बालात्रिपूरसुंदरी : विद्या उपासना देवी, महात्रिपूरसुंदरी देवीचे कुमारी स्वरूप.रविवार (दि. ९) महिषासूरमर्दिनी : महिषासूर दैत्याचा नाश करणारी पारंपरिक पूजा.सोमवार (दि. १०) : गायत्रीदेवी : शक्ती उपासना देवीमंगळवार (दि.११) रथामधील पूजा : सीमोल्लंघनासाठी निघालेली देवी.