शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

निलोफर आजरेकरच १५ नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:56 IST

कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहेत. आता दोन महिन्यांसाठी बदल करणे शक्य नाही असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केल्यामुळे त्या संदर्भातील हालचाली थांबल्या.

ठळक मुद्दे बदल नाही, आजरेकरच १५ नोव्हेंबरपर्यंत महापौरमहापालिकेवर प्रशासक नियुक्त होणार

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहेत. आता दोन महिन्यांसाठी बदल करणे शक्य नाही असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केल्यामुळे त्या संदर्भातील हालचाली थांबल्या.कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपणार आहे. तत्पूर्वी, सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येणे अपेक्षित होते, परंतु राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढलेला असल्याने कोणतीही निवडणूक घेण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने देखील यासंदर्भात कोणतीही अधिसूचना काढलेली नाही.मार्च महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची साथ ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आटोक्यात येईल, या अपेक्षेने निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून कार्यालयात बसून जी कामे करता येणे शक्य आहेत ती करावीत, असे निवडणूक आयोगाने कळविले होते.

ती कामे प्रशासनाने केली आहेत, परंतु मतदारयाद्या तयार करणे, आरक्षणे टाकणे, प्रभाग रचना यासारखी गर्दी होणारी, परंतु महत्त्वाची कामे करण्यात आलेली नाहीत. म्हणूनच १५ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घेणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक नियुक्तीचा एकमेव पर्याय राहतो.१६ नोव्हेंबरपासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात जाणार हे स्पष्ट आहे. प्रशासक कोण होणार हाच आता उत्सुकतेचा मुद्दा आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची सेवा जेमतेम एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच प्रशासक म्हणून कार्यभार सोपविला जाऊ शकतो.महापौर निवडणूक घेण्याच्या मध्यंतरी जोरदार हालचाली सुरू होत्या. दोन अडीच महिन्यांसाठी ही संधी दीपा मगदूम यांना देण्याचे ठरले होते, परंतु महापौर निवडणूक ऑनलाईन घेणे शक्य नसल्याने त्याला नगरविकास खात्याची परवानगी मिळाली नाही. निलोफर आजरेकर याच आता १५ नोव्हेंबरपर्यंत महापौर पदी राहणार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर