शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सभाच तहकूबचा महापौरांचा डाव

By admin | Updated: March 15, 2015 00:44 IST

मंडलिक यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करून सभा तहकूब केली जाणार

कोल्हापूर : उद्या, सोमवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांचे अधिकार काढून घ्यावेत, त्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी होणार हे गृहीत धरून ही सभाच तहकूब करण्याची रणनीती महापौर तृप्ती माळवी यांनी आखली आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करून सभा तहकूब केली जाणार आहे. काहीही करून, कोणतेही मुद्दे घेऊन महापौर तृप्ती माळवी यांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्याचा निर्धार कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. विशेष सभा बोलाविण्यास ठाम नकार देणाऱ्या माळवी यांनी उद्या सर्वसाधारण सभा बोलावून एकप्रकारे दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांना शहच दिल्याचे मानले जात आहे. जरी नगरसेवकांनी महापौर माळवी यांच्या विरोधात ठराव करून राज्य सरकारला तो पाठविण्याचे ठरविले असले, तरी उद्याची सभाच मंडलिक यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्याचा डाव माळवी यांनी रचला आहे. सभेच्या कामकाजपत्रिकेवर प्रथम शोक प्रस्ताव घेतले जातात. त्यानंतर पुढील कामकाज सुरू होते. याच संधीचा फायदा त्या घेण्याची शक्यता आहे. शोक प्रस्तावाचे वाचन झाल्यावर लागलीच चर्चा सुरू करून नंतर पुढील कोणतेही कामकाज न घेता महापौर माळवी सभा तहकूब करतील, अशी चर्चा महानगरपालिका वर्तुळात शनिवारी सुरू होती. उद्याच्या सभेत महापौरांवर नैतिक अध:पतनच्या मुद्द्यावर कारवाई करावी, असा ठराव केला जाणार आहे. शिवाय त्यांना पालिकेने दिलेले वाहन, मोबाईल, कर्मचारी आदी सुविधा काढून घ्याव्यात, अशी मागणीही केली जाणार आहे; परंतु महापौरांनी जर सभा तहकूब केली, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरणार आहेत. ठराव झाला तरी अंमलबजावणीचं काय? महापौर माळवी या लाच स्वीकारताना सापडल्या असून, त्यांच्यावर कारवाई झाली आहे; परंतु जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना पदावरून हटविता येत नाही. त्यामुळे सोमवारच्या सभेत जरी ठराव झाला, तरी त्या ठरावाची अंमलबजावणी कोण आणि कोणत्या आधारावर करणार हाच प्रश्न आहे.(प्रतिनिधी)