शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर गवंडी यांच्यासह उपमहापौर शेटे यांचाही राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 13:30 IST

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत आपला राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल ...

ठळक मुद्देमहापौर गवंडी यांच्यासह उपमहापौर शेटे यांचाही राजीनामा नवीन महापौर निवडणुकीच्या हालचाली वेग

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत आपला राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल शेट्ये यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे दोन्ही राजीनामे सभेमध्ये मंजूर करण्यात आले आहेत.महापालिकेतील सत्तापदे वाटपात ठरलेली मुदत संपल्यामुळे महापौरांना पक्षाने राजीनामा देण्यास सांगितले होते. लगेचच नवीन महापौर निवडणुकीच्या हालचाली वेग येणार आहे.महानगरपालिकेत महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आणि कालावधी कमी अशी अवस्था झाल्यामुळे नेत्यांपुढेही दुसरा पर्याय राहिलेला नाही. गवंडी यांना केवळ चार महिने, तर सूरमंजिरी लाटकर यांना चार महिन्यांचा कालावधी देण्याचे ठरले होते.

दोन महिने पूर्ण होण्याआधीच विधानसभेची निवडणूक लागली आणि महापौरपदाची निवडणूक घेण्यावर निर्बंध आले; त्यामुळे गवंडी यांना दोन महिन्यांऐवजी चार महिने मुदत मिळाली.महापौरपदाची निवडणूक घेण्यावरील राज्य सरकारचे निर्बंध उठल्यामुळे माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल शेट््ये यांनीही राजीनामा दिला आहे.

त्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन महापौर निवडीची तारीख विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निश्चित करून घेण्यात येईल; त्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे तारखेचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यानंतर नवीन महापौर निवडणुकीच्या हालचाली वेग येणार आहे.

राष्ट्रवादीकडून पुढील महापौरपदासाठी सूरमंजिरी लाटकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर त्यांच्याविरोधात भाजप-ताराराणी आघाडीकडून स्मिता मारुती माने यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. माने यांचे नाव निश्चित झाले तर लाटकर यांच्याबरोबरची त्यांची लढत लक्षवेधी होईल. निवडणुकीत चांगलाच रंग भरला जाईल. सध्याच्या परिस्थितीत महापालिका सभागृहात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत आहे.लाटकर यांना किती महिने मिळणार ?सूरमंजिरी लाटकर या महापौर होण्यात कसलीही अडचण नसली, तरी त्यांना या पदावर काम करण्याकरिता किती महिन्यांची संधी मिळणार हा विषय उत्सुकतेचा आहे. जर कमी कालावधी मिळाला तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होणार आहे; त्यामुळे कॉँग्रेसच्या कोट्यातील दोन ते चार महिने त्यांना द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीकडून होण्याची शक्यता आहे.

मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी तर यापूर्वीच ठरल्याप्रमाणेच होईल, असा खुलासा केला आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर