शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौर निवड १६ नोव्हेंबरला शक्य

By admin | Updated: November 4, 2015 00:41 IST

विभागीय आयुक्तांना पत्र : राजकीय हालचाली गतिमान

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली सभा सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) होण्याची शक्यता असून, या सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाईल. नव्या सभागृहाची सभा घेण्यास अनुमती देण्याची विनंती करणारे पत्र मंगळवारी नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविले. त्याला दोन दिवसांत सहमती मिळेल, असे सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सर्व सदस्यांची नावे मंगळवारीच राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध करण्यात आली. विद्यमान सभागृहाची मुदत १४ नोव्हेंबरला संपत असून, नवीन सभागृह १५ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे, त्यानुसार मनपा प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. १६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता नव्या सभागृहाची बैठक होण्याची शक्यता आहे. पहिल्या सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाईल. महापौरपदासाठी यवलुजे यांचे नाव आघाडीवरमहापौरपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गातील स्वाती यवलुजे, अश्विनी रामाणे, दीपा मगदूम व उमा बनसोडे या चार नगरसेविका कॉँग्रेसमध्ये असून, त्यामध्ये स्वाती यवलुजे यांचे नाव आघाडीवर आहे. स्वाती यवलुजे यांचे पती सागर यवलुजे यांचे सतेज पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. शिवाय त्या कसबा बावड्याच्या रहिवासी आहेत. त्यामुळे प्राधान्य कसबा बावड्याला द्यायचे झाल्यास स्वाती यवलुजे यांचेच नाव आघाडीवर येते. पाच स्वीकृत सदस्यमहानगरपालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात येताच स्वीकृत सदस्य म्हणून पाचजणांची निवड करण्यात येणार आहे. गतवेळच्या सभागृहातही पाच सदस्य स्वीकृत होते. तीच संख्या यावेळीही कायम ठेवली आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या सदस्य संख्येनुसार स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार मिळणार आहे. कॉँग्रेसचे सर्वाधिक २७ सदस्य असल्याने त्यांचे २, राष्ट्रवादी कॉँग्रेस १, भाजप १ व ताराराणी आघाडी १ असे स्वीकृत सदस्य सभागृहात जातील.महापौर, उपमहापौरांसाठी सोमवारी अर्ज भरणार ? १५ नोव्हेंबरला महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली सभा घ्यायची ठरल्यास सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत (दि. ९ नोव्हेंबर) महापौर व उपमहापौरपदांसाठी उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत. कारण दिवाळीनिमित्त महापालिकेला मंगळवार (दि. १०) ते रविवार ( दि. १५ नोव्हेंबर) अशा सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदांसाठीच्या हालचाली आतापासूनच गतिमान झाल्या आहेत.