शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२८ मे. टन मळीचा टँकर पकडला-दाजीपूर नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:18 IST

गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. २८ मे. टन मळीसह टँकर असा सुमारे १३ लाख

ठळक मुद्देमळी कायदेशीरपणे महाराष्ट्रात आणण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता.

कोल्हापूर : गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. २८ मे. टन मळीसह टँकर असा सुमारे १३ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित चालक ओमप्रकाश रामवध यादव (वय ४५, रा. हिंदुस्थान नगर, मुंबई) याला अटक केली आहे. त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तो दारू बनविण्यासाठी मळी सांगलीला घेऊन चालला होता. याप्रकरणी सखोल तपास सुरू असल्याची माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमारेषेवर दाजीपूर, राधानगरी, कानूर, चंदगड, आजरा, शिवनाकवाडी, कागल, गगनबावडा, आदी ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. कोल्हापुरात येणारे प्रत्येक वाहन तपासून सोडले जाते. ३१ मार्चला भरारी पथक राधानगरी तालुक्यात दाजीपूर चेकनाक्यावर तपासणी करीत असताना मळी घेऊन जाणारा टँकर मिळून आला. टॅँकरमध्ये मळी होती. हा द्रव पदार्थ सांगली जिल्ह्यात खत म्हणून शेतात टाकण्यासाठी आपण घेऊन जात आहे, असे चालक यादव याने पथकाला सांगितले; परंतु मळी कायदेशीरपणे महाराष्ट्रात आणण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे मद्य तयार करण्यासाठीच अशा प्रकारची मळी नेत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

टॅँकरमधील हे रसायन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले असता ती मळी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पुढील कारवाई करण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. यावेळी उपअधीक्षक बापूसो चौगुले, वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग पाटील, दुय्यम निरीक्षक अविनाश घाटगे, माधव चव्हाण, भीमराव बच्चे, प्रदीप गुरव, इंद्रजित कांबळे, ज्योती कंदले, आदी उपस्थित होते. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेला मळीचा टँकर व आरोपी. (छाया : दीपक जाधव) 

टॅग्स :Policeपोलिस