शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मोर्चासाठी मावळे, रणरागिणी सज्ज

By admin | Updated: October 13, 2016 02:11 IST

मराठा क्रांती मोर्चा : उद्या रंगीत तालीम; गल्ली, पेठांमध्ये तालमी, मंडळांच्या बैठकांना जोर

कोल्हापूर : शनिवारी होणाऱ्या सकल मराठा मोर्चासाठी कोल्हापुरातील दहा हजार मावळे व रणरागिणी सज्ज झाले आहेत. या मोर्चाचे नियोजन, पार्किंगची ठिकाणे, आपत्ती व्यवस्थापन या सगळ््याच्या तयारीसाठी उद्या, शुक्रवारी पोलिस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, मावळे व रणरागिणींची प्रत्यक्ष मोर्चाच्या मार्गावर रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शहरातील गल्ल्यांमध्ये, पेठांमध्ये, तालीम, मंडळांमध्ये मोर्चात सहभागी होण्यासाठीच्या बैठका सुरू आहेत. शासकीय आकडेवारीनुसार मोर्चात किमान ३० लाख नागरिक सहभागी होणार आहेत. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या नागरिकांच्या सहभागाचे नियोजन करण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या मदतीला कोल्हापुरातील तरुण मावळे आणि रणरागिणी सरसावल्या आहेत. त्यांच्यासाठी बुधवारी न्यू कॉलेज येथे मोर्चा व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोर्चाला किंवा कोल्हापूरच्या नावलौकिकाला बाधा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य करू नका. स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी शहरासह बाह्य परिसरातील पार्किंगची ठिकाणे समजावून सांगितली. उद्या, शुक्रवारी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर मावळे आणि रणरागिणींनी जमायचे आहे. शेंडा पार्कात वाहनतळाची सफाईकोल्हापूर : शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण कोल्हापूर शहरात जय्यत तयारी सुरू केली आहे. बाहेरगावांहून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुख्य वाहनतळ असणाऱ्या शेंडा पार्क मैदानाची बुधवारी पाहणी करून येथे साफसफाई करण्यात आली. दरम्यान, ‘मोर्चाला यायचं’ असे जनजागृतीचे फलक संपूर्ण शहरासह जिल्हाभर झळकू लागले आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने निघणाऱ्या मराठा क्रांती विराट मोर्चाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर बैठका सुरू आहेत, तर विशेषत: युवा पिढीने या मोर्चाचे नेतृत्व हाती घेतल्याने त्याच्या नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे. या मोर्चामध्ये सुमारे ३० लाख नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असल्याने हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे. त्या पद्धतीने त्याचे नियोजन करण्यासाठी सारे कोल्हापूर सज्ज झाले आहे.या मोर्चातील स्वयंसेवकांची भूमिका बजावणारे मावळे व रणरागिणी शनिवारच्या लढ्यासाठी सज्ज झाले आहेत. सुमारे दहा हजार मावळे व रणरागिणींनी मोर्चासाठी आपली आचारसंहिता ठरवून घेतली आहे. त्याबाबत नियोजनासाठी त्यांची बुधवारी तिसरी बैठकही झाली.मोर्चाच्या जनजागृतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत, संपूर्ण शहरातील चौका-चौकांत ‘मोर्चाला यायचं’ असे भव्य फलक उभारले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर व जिल्हा डिजिटल फलकमय झाले आहे. प्रत्येक फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे व मराठेशाहीचा इतिहास रेखाटला आहे. याबाबत नियोजनसाठी असणारी ‘वॉररूम’ कार्यकर्त्यांनी फुलून गेली आहेत. (प्रतिनिधी)