शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

माउलींचे पाऊल साताऱ्याच्या अंगणात!

By admin | Updated: July 16, 2015 23:55 IST

उत्साहात स्वागत : पादुकांच्या नीरा स्नानानंतर वैष्णवांचा मेळा जिल्ह्यात दाखल

लोणंद/खंडाळा : पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान,आणिक दर्शन विठोबाचे,हेचि घडो मज जन्मजन्मांतरी,मागणे श्रीहरी नाही दुजे...ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी, नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि देहभान विसरून नाचणारा वैष्णवांचा मेळा अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरातिरी गुरुवारी उत्साहात स्वागत झाले.माउलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यांतूनही लाखो वारकरी लोणंदनगरीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पुणे जिल्ह्यातून पालखीचे दुपारी दोनला आगमन झाले. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.जिल्ह्याच्या सीमेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, आमदार मकरंद पाटील, समाजकल्याण समितीचे माजी सभापती आनंदराव शेळके-पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती रमेश धायगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, अनिरुद्ध गाढवे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी विलासराव साबळे, राहुल घाडगे, गुरुदेव बरदाडे, शामराव गाढवे उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सातारचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे पालखीची सूत्रे सुपूर्द केली. (प्रतिनिधी) नीरा तीर दुमदुमलाआळंदी ते पंढरपूर वारीमध्ये माउलींच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्तघाटावर अभ्यंगस्नान घातले गेले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. माउलींचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वैष्णवांनी ‘माउली, माउली..’चा जयघोष केला. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. दुपारी २.२५ वाजता अभ्यंगस्नान झाल्यानंतर पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या. दिंडी प्रमुखांच्या आदेशाने पालखी रथ सातारा जिल्ह्याच्या स्वागतकमानीजवळ आला. त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.