शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माउली जमदाडे ‘भोगावती साखर केसरी’

By admin | Updated: December 25, 2015 01:04 IST

मानाची भोगावती साखर केसरीची लढत जमदाडे आणि दोरवड यांच्यात २२ मिनिटे चालली

भोगावती : भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात गंगावेश तालमीचा माउली जमदाडे भोगावती साखर केसरीचा मानकरी ठरला. त्याने न्यू शाहूपुरीच्या संतोष दोरवडला चितपट केले, तर भोगावती कामगार केसरीचा संदीप वाळकुंजे, तर भोगावती ऊस वाहतूक केसरीचा सचिन जामदार मानकरी ठरला.मानाची भोगावती साखर केसरीची लढत जमदाडे आणि दोरवड यांच्यात २२ मिनिटे चालली. यात सुरुवातीला जमदाडेने पायाला चाट मारत दुहेरी कब्जा काढत घिस्सा डावावर आघाडी घेतली. मध्यंतरी वेळेत दोरवडने पुड्डीत घिस्सा, मोर्चा काढून, दुहेरी पट, किल्ली तोड या डावाचा वापर करत जमदाडेवर कब्जा मिळवला. मात्र त्याने ताकदीने प्रतिकार करत एकेरी पट काढून झोळी बांधण्याचा प्रयत्न केला आणि पाठीमागच्या झोळी डावावर दोरवडचा पराभव केला.भोगावती कामगार केसरी या किताबासाठी मोतीबाग तालमीचा विजय धुमाळ आणि इचलकरंजीच्या प्रकाश आवाडे अकॅडमीचा संदीप वाळकुजे यांच्यात लढत झाली. ३९ मिनिटे चाललेली ही लढत गुणावर सोडवण्यात आली. यात संदीप वाळकुजे विजयी ठरला. या लढतीत सुरुवातीपासून धुमाळ याने घुडणा डाव, एकेरी पट आकडी काढत, पट काढण्याचा प्रयत्न करत वरचढ ठरला होता, मात्र वाळकुजे याने चमकदार कामगिरी करीत गुणावर २९ मिनिटाला मात केली.ऊस वाहतूक केसरीच्या लढतीत गंगावेश तालमीच्या सचिन जामदार याने मोतीबाग तालमीच्या श्रीपती कर्णवट याच्यावर मात केली. ३९व्या मिनिटाला आकडी डावावर त्याने विजय मिळवला. या लढतीत दोघेही मल्ल ताकदीने समान असल्यामुळे शेवटपर्यंत कोण विजयी होईल, हे सांगता येत नव्हते.यावेळी कृष्णा साखर कारखान्याचे संचालक अविनाश मोहिते यांच्याहस्ते लढती लावण्यात आल्या. प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आखाडा पूजन वसंतराव पाटील यांच्याहस्ते, तर प्रतिमा पूजन कृष्णराव किरुळकर यांच्याहस्ते करण्यात आले. धैर्यशील पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पंच म्हणून संभाजी वरुटे, कृष्णात कळंत्रे, रामा माने यांनी काम पाहिले. निवेदन बापूसोा राडे आणि कृष्णात चौगले यांनी केले. (वार्ताहर)भोगावती येथे दादासाहेब पाटील पुण्यतिथी निमित्त झालेल्या मैदानात भोगावती साखर केसरी कुस्ती लावताना अविनाश मोहिते, धैर्यशील पाटील, केरबा पाटील, अशोकराव पाटील व इतर मान्यवर.