शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेसाठी मातब्बरांचे अर्ज दाखल

By admin | Updated: April 7, 2015 01:22 IST

इच्छुकांची मांदियाळी : मुश्रीफ, महाडिक, शेट्टी, ‘पी. एन.’, ‘के. पीं.’चे उमेदवारी अर्ज; १०७ जणांचे १५५ अर्ज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँक निवडणुकीसाठी (केडीसीसी) सोमवारी १०७ जणांनी १५५ अर्ज दाखल केले. खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, आमदार अमल महाडिक, के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, संजय मंडलिक, निवेदिता माने, अरुंधती महाडिक, राजलक्ष्मी खानविलकर, आदी प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पी. एन. पाटील, खासदार शेट्टी यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला, तर आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक, आमदार महाडिक यांनी सूचकांकडून अर्ज दाखल केला. आमदार मुश्रीफ यांनी प्रवीण भोसले, तर आमदार महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद शहाजी पाटील यांच्यामार्फत अर्ज दाखल केले. पी. एन. पाटील व त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. के. पी. पाटील यांनी स्वत: येऊन अर्ज भरला. बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, बाबूराव हजारे, बॅँकेचे माजी व्यवस्थापक असिफ फरास, रणजितसिंह कृष्णराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, आशिष आनंदराव पाटील, बाबूराव हजारे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, पुंडलिक रावजी पाटील, वेदांतिका धैर्यशील माने, माधुरी मधुकर जांभळे, आदींनी अर्ज दाखल केले. चंदगड व शाहूवाडी तालुक्यातून संस्था गटातून एकही अर्ज दाखल झाला नाही.आघाडीचा चर्चेनंतर निर्णय : पी. एन.अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पी. एन. पाटील म्हणाले, आम्ही सत्तेत असताना कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्जे दिली, अनेक योजना सुरू केल्या, व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून कर्मचाऱ्यांचे पगार वाढविले. विकास सेवा संस्थांच्या सचिवांनाही चांगले पगार केले. मागील काळात बॅँकेत कोणी पैसे खाल्ले नाहीत, थकीत रकमेपोटी कारवाई झालेली आहे, ती कारवाईही चुकीची आहे. न्यायदेवतेने आमच्या बाजूने निकाल दिला. १४७ कोटी थकीत नाहीत. ६० कोटी पर्यंत थकबाकी आहे, त्यातील ५० कोटी आम्ही वसूल करून देऊ शकतो. बॅँकेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. जिल्ह्णातील कॉँग्रेस नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत निर्णय घेउ, असेही त्यांनी सांगितले.