शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

रुकडीकर ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:27 IST

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील २५ हून अधिक गावांतील पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना येथील श्री सद्‌गुरू ...

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील २५ हून अधिक गावांतील पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना येथील श्री सद्‌गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट यांच्यावतीने प्रापंचिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यांना टीम निरंजन आणि क्विक हिल फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.

चारशेहेहून अधिक कुटुंबांना प्रत्येकी तीन ब्लॅंकेट, दोन चटई अशा एकूण ८०० चटई आणि १३०० ब्लॅँकेटचे वितरण करण्यात आले. गगनबावड्यातील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी ४० हजार स्ट्रीप्स रस माधव वटी औषधाचेही वाटप करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, विश्ववती चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांच्या उपस्थितीमध्ये उपक्रम झाला. गगनबावडा गटविकास अधिकारी माधुरी परीट, ग्रामविस्तार अधिकारी टोणपे, दाभाडे, गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याच संस्थांच्यावतीने पुण्यातील मुरलीधर लायगुडे रुग्णालयाच्या कोविड सेंटरला ऑक्सिजन मास्क, डिस्पोजेबल सिरिंज, पाच हजार ग्लोव्हज यासह आवश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या. यावेळी डॉ. तुषार सौदंणकर, डॉ. अभय जमदग्नी, डॉ. राहुल शेलार, क्विक हिल फाऊंडेशनच्या श्रीमती काटकर उपस्थित होत्या.