शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘अनिकेत’चा १७ व्या वर्षी ४९ लाखांचा मास्टर स्ट्रोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:41 IST

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : फुटबॉलचे अफाट कौशल्य आणि जिद्द या जोरावर कोल्हापूरचा व सतरा वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघातील स्ट्रायकर अनिकेत जाधव यास जमशेदपूर एफसी संघ फुटबॉल संघाने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. याकरिता त्याला ४९ लाखांचे मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू ठरला आहे.आगामी ...

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : फुटबॉलचे अफाट कौशल्य आणि जिद्द या जोरावर कोल्हापूरचा व सतरा वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघातील स्ट्रायकर अनिकेत जाधव यास जमशेदपूर एफसी संघ फुटबॉल संघाने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. याकरिता त्याला ४९ लाखांचे मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू ठरला आहे.आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तो जमशेदपूर एफसी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या वर्षी त्याने भारतात प्रथमच भरलेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. वयाच्या १७ व्या वर्षी अनिकेतने भारतीय फुटबॉल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे त्याला भारतातील अनेक नामांकित संघांकडून करारबद्ध होण्यासाठी मागणी वाढली आहे.युवा विश्वचषक स्पर्धेनंतर तो भारतीय फुटबॉल महासंघाच्या इंडियन अ‍ॅरो संघाकडून आयलीग स्पर्धेत खेळला. त्यातही त्याने आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते. या स्पर्धेतही त्याने गोल करण्यात आघाडी घेतली होती. त्याच्या एकूणच या कामगिरीची दखल घेऊन जमशेदपूर फुटबॉल संघाने त्याला आपल्या संघाकडून खेळण्यासाठी ४९ लाख रुपयांच्या पॅकेजची आॅफर दिली. त्यानुसार या प्रस्तावास अनिकतने होकारही दर्शविला आहे. जमशेदपूर संघाकडून खेळण्याच्या कराराच्या तांत्रिक बाबी येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहेत. त्यानुसार तो ४९ लाखांच्या करारावर स्वाक्षरी करणार असून, दोन वर्षे या संघातून तो खेळण्यास करारबद्ध असणार आहे.यापूर्वी कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉपटू गोलरक्षक सुखदेव पाटील यालासुद्धा दिल्ली डायनामोज एफसी संघाने ४७ लाखांच्या पॅकेजवर करारबद्ध केले आहे. यासह निखिल कदम हाही देशातील अव्वल संघ कोलकात्याच्या मोहन बागानकडून चांगल्या मानधनावर खेळत आहे. त्यात आता अनिकेतची भर पडेल. एकूणच कोल्हापूरचा फुटबॉल या तिघांच्या रूपाने देशभरात पोहोचणार आहे.जमशेदपूर एफ.सी.कडून आलेल्या प्रस्तावास मी होकार दिला आहे; परंतु अद्यापही करार झालेला नाही. हा करार येत्या काही दिवसांत होईल आणि मी त्या संघाकडून खेळेन.- अनिकेत जाधव,