शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मसाई पठारावरील ‘मसाई’च गायब

By admin | Updated: June 9, 2015 00:12 IST

तपास ‘जैसे थे’ : फक्त पठारच शिल्लक; अंधश्रद्धा की चोरी? ग्रामस्थांत चर्चा

कोतोली : कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ९०० एकर क्षेत्र असलेल्या पठारावरील मसाई देवीच्या मंदिरातील पाच मूर्तींची चोरी झाली आहे. या घटनेला आठवडा लोटला तरी याबाबत तपास ‘जैसे थे’ आहे. यामुळे भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पौर्णिमेच्या रात्री मंदिरामधील सिंहासनावरील बैठी मसाईदेवीची दगडी मूर्ती, त्याचबरोबर तीन संगमरवरी मूर्ती, सहा घोडे अशा मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, तर याबाबत कोडोली पोलिसांनी तपास सुरू आहे असे सांगून आपले हात वर केले आहेत. या चोरीमुळे जिल्ह्यातील जागृत देवस्थानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यासाठी गेलेले मसाई देवीचे पुजारी गणपती दळवी यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यावेळी त्यांनी या चोरीच्या प्रकाराची माहिती कोडोली पोलीस ठाण्यात दिली. मसाई देवी ही कौल घेणे, कौल देणे अशा बाबतीत प्रसिद्ध आहे. यामुळे प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी या मसाई मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.सोमवारी (दि. १) पौर्णिमा होती. त्याच रात्री मसाई पठारावरील पाच मूर्तींच्या चोरीचा प्रकार घडला असून, पूर्वकालीन असलेल्या या दगडाच्या मूर्तींचे वजनही १५० ते २०० किलो एवढे होते, असे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे मूर्ती चोरणारे एक-दोघे नसणार असा प्राथमिक अंदाज परिसरातील नागरिकांनी लावला आहे. पूर्वी पठारावर जाण्यासाठी वाट नव्हती. पर्यटकांचा विचार करून बुधवार पेठमार्गे मसाई पठारावर येण्यासाठी रस्ता करण्यात आला होता; पण या रस्त्याचा उपयोग मात्र चोरट्यांनी चोरीच्या कामासाठी केला.सुमारे ९०० एकरांचे पठार असून, या ठिकाणी पांडवकालीन गुहा आहेत. पन्हाळ््याबरोबर मसाई पठारही प्रेमीयुगुलांचे मोक्याचे ठिकाण बनले होते, पण पौर्णिमेच्या रात्री मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याने अंधश्रद्धेचा विषय परिसरात जोरात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांनी या पूर्वकालीन मूर्ती विक्री करण्यासाठी तरी चोरल्या नसतील ना? अशी शक्यताही जोर धरत आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गोष्टींचा विचार करून तपास करणे गरजेचे आहे.देवीच्या २५ साड्या, एक सूप भरून कुंकू व दोन हजार रुपये मंदिराच्या बाहेर आढळून आल्याचे परिसरातील नागरिकांत बोलले जात आहे. त्यामुळे ही चोरी अंधश्रद्धेच्या माध्यमातून झाली असल्याचा अंदाज लावला जात आहे.९०० एकरांच्या पठारावरील मंदिरातील पौर्णिमेच्या रात्री पाच मूर्ती चोरीला जाणे व त्या ठिकाणी पारंपरिक विधी घेणे ही गोष्ट अंधश्रद्धेची आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन विभागानेही लक्ष घालावे.मसाई पठारावरील मूर्ती चोरीला जाणे, ही गोष्टच लाजिरवाणी असून, या चोरीच्या मागे धर्मांध शक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. - बाजीराव उदाळे, सरपंच, वाघवे