शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

सामाजिक कार्यात अग्रेसर ‘मारवाडी’

By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST

कोल्हापुरात दीडशे वर्षांपासून वास्तव्य : छत्रपती शाहू महाराजांकडून राजस्थानी सराफी कारागिरांचे पाचारण

भारत चव्हाण - कोल्हापूरमारवाडी समाजाला त्यांच्या व्यवसायातील सचोटीमुळे एकेकाळी कंजूषपणाची उपमा दिली जायची. त्यावरूनच पुढे कंजूष मारवाडी, चिक्कू मारवाडी हे शब्द प्रचलित झाले; परंतु व्यवसायातील चिकाटी, एकमेकांना सहकार्य करण्याची आणि आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम गरीब, गरजू व मुक्या प्राण्यांच्या पालनपोषणावर खर्च करण्याच्या दानशूर वृत्तीद्वारे समाजाने कंजूषपणाची छाया पुसून टाकली. आपद्ग्रस्तांना मदत करण्याचा प्रसंग असो की गोरगरीब, गरजू लोकांना मदत करण्याचा प्रसंग असो; हाच समाज सदैव आघाडीवर राहिला आहे. कोल्हापुरातील मारवाडी समाजाने हा वारसा गेल्या अनेक वर्षांपासून जपला आहे. ‘जहॉँ न जाए बैलगाडी, वहॉँ जाए मारवाडी’ असं मारवाडी समाजाच्याबाबतीत म्हटले जाते. व्यवसायाच्या निमित्ताने हा समाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी समाजातील काही लोक कोल्हापूर शहरात वास्तव्यास आले. सोन्या-चांदीचे दागिने तयार करणाऱ्या मशहूर सराफी कारागिरांना छत्रपती शाहू महाराजांनी राजस्थानहून कोल्हापुरात आणले. त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन दिले. तत्कालीन कुटुंबांची चौथी, पाचवी पिढी येथे आता कार्यरत आहे. मुळात कष्टाळू, धार्मिक असलेला हा समाज आता कोल्हापूरच्या समाजजीवनाशी एकरूप झाला असून, सुमारे साडेतीन हजार कुटुंबे कोल्हापूरचा अविभाज्य भाग बनली आहेत. अन्य समाजांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. धार्मिक, व्यावसायिक, दानशूर, परोपकारी अशा गुणांनी या समाजाने कोल्हापूरकरांशी जवळीक साधली आहे.धार्मिक वातावरणाशी जोडलेला समाज राजस्थानी म्हणजेच मारवाडी समाज होय. तो धार्मिकतेशी जोडला गेला आहे. आपला व्यवसाय आणि आपले कुटुंब यापलीक डे जाऊन समाज म्हणून एकत्र येण्याचे सर्वमान्य ठिकाण म्हणजे भगवान महावीरांचं मंदिर हे आहे. समाजाला एकत्र जोडण्याची आणि धार्मिकता आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात पाच मोठी मंदिरं आहेत. संभवनाथ मंदिर ट्रस्ट, गुजरी (अध्यक्ष - नरेंद्र अमिचंद ओसवाल), लक्ष्मीपुरी मंदिर ट्रस्ट, लक्ष्मीपुरी (अध्यक्ष - कांतीलाल गुलाबचंद ओसवाल), भक्तिपूजानगर मंदिर ट्रस्ट (अध्यक्ष - ललित गांधी), महावीरनगर मंदिर ट्रस्ट (अध्यक्ष - लीलाचंद मूलचंद ओसवाल) व सीमंधर स्वामी मंदिर ट्रस्ट, शिरोली (अमर गांधी) ही ती मंदिरे आहेत. या मंदिरांत दैनंदिन पूजाअर्चा, आरती होत असते. या धार्मिक कार्यक्रमांत समाजातील लोक श्रद्धेने सहभागी होतात. वर्षभरातील महत्त्वाचे सण या समाजात अनेक सण, व्रतवैकल्ये केली जातात. पर्यूषण महापर्व (क्षमापण पर्व) व ओळी हे महत्त्वाचे सण आहेत. चातुर्मासात उपवास केले जातात. महावीर जन्मकल्याणक (जयंती) सण म्हणूनच साजरी केली जाते. चोवीस तीर्थंकरांच्या कल्याणकाच्या दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व कार्यक्रमांत समाजातील लोक सहकुटुंब सहभागी होतात. समाजातील महिलावर्ग अत्यंत कडक उपवास व व्रत करतो. शैक्षणिक कार्यात अग्रेसर कोल्हापूर शहरात महावीर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चेअरमन ललित गांधी यांनी शैक्षणिक कार्य हाती घेतले आहे. मारवाडी समाजातील ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे. महावीर इंग्लिश स्कू ल, ब्लॉसम, गोल्डन शॉवर, सह्याद्री पब्लिक स्कूल तसेच केर्ली येथील दोन शाळांतून सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केर्लीच्या शाळेत तर गरीब मुलांनी कपडे व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. व्यवसायाचा विस्तारकोल्हापूर जिल्ह्यात साधारणपणे साडेतीन हजार मारवाडी जैन समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांपैकी ८०० ते ९०० कुटुंबे ही कोल्हापूर शहरात राहतात. या समाजातील लोकांचा व्यवसाय हा प्रामुख्याने सराफी असला तरी अलीकडील काळात काहीजण व्यापार, भांडी व कापड उद्योग, बांधकाम व्यवसाय, कारखानदारीकडेही वळलेला आहे. काहीजण ट्रेडिंगमध्येही उतरले आहेत. आपल्या व्यवसायाचा चोख हिशेब ठेवणे हा या समाजाचा चांगला गुण आहे. संस्काराला सर्वाधिक प्राधान्य आपल्या मुलांवर चांगले संस्कार निर्माण करण्याला मारवाडी समाजात सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे लहान वयातच मुलांना मंदिरात नेले जाते. धार्मिक प्रवचनासारख्या कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेतले जाते. मंदिरातच छोट्या मुलांसाठी पाठशाला असतात. तेथे संस्कारांचे व धार्मिक शिक्षण दिले जाते. लहान वयातच जे संस्कार होतात, तेच पुढे कायम राहतात; म्हणूनच मुलांना त्यांचे पालक अशा कार्याला प्राधान्य देतात.मारवाडी समाजातील प्रतिष्ठित घराणीकोल्हापुरात मारवाडी जैन समाजातील काही प्रमुख घराणी आहेत. त्यांच्या नावांचा आदरयुक्त दबदबा आहे. या घराण्यांना अनेक वर्षांचा इतिहास व परंपरा लाभलेली आहे. त्यागी, परोपकारी, धार्मिक, यशस्वी व्यावसायिक, दानशूर अशा सर्वार्थांनी या घराण्यांचा उज्ज्वल इतिहास आहे. या घराण्यातील तिसरी, चौथी पिढी कोल्हापुरात आपला वारसा चालवीत आहे. त्यांपैकी प्रमुख घराणी पुढीलप्रमाणे आहेत :शेलाजी वनाजी संघवी असलज दरगाजी निंबजीयाहुकमीचंद डुंगाजी राठोड जोधाजी माशिंगजी परमारसाकलचंद दोलाजी गांधीहिंदुमल जितराज राठोड कमी खर्चात वैद्यकीय सेवा मोफत दिले म्हणायचे नाही म्हणून अगदी नाममात्र म्हणजे पाच व दहा रुपयांत औषधोपचार करण्यासाठी दोन संस्था पुढे आल्या आहेत. विनोद ओसवाल अध्यक्ष असलेल्या भगवान महावीर सेवाधाम ट्रस्ट, गुजरी संस्थेतर्फे पाच रुपयांत सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात. एक्स-रे, ईसीजी केवळ पाच रुपयांत काढले जातात. रुग्णांना व्हीलचेअर, वॉकर, बेड पुरविले जातात. ‘बीपीएल’च्या रु ग्णांची मोतीबिंदू आॅपरेशन्स केली जातात. संस्थेच्यावतीने लवकरच तीन कोटी रुपये खर्चून सात हजार स्क्वेअर फुटांच्या जागेत एक सुसज्ज व अत्याधुनिक सेवा देणारे हाॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. आॅपरेशन थिएटरसह एमआरआय, सीटी स्कॅन करण्याची सोय तेथे असणार आहे. महावीरनगर येथे गेल्या दहा वर्षांपासून भगवान महावीर मानवसेवा उपचार केंद्र चालविले जाते. त्याचे अध्यक्ष रमेश जैन आहेत. या केंद्राद्वारे केवळ दहा रुपये तपासणी शुल्कामध्ये वैद्यकीय उपचार केले जातात. या संस्थेची स्वतंत्र हॉस्पिटल बांधण्याची तयारी सुरू आहे.सामाजिक क्षेत्रातील योगदान सामाजिक क्षेत्रात या समाजाचे योगदान मोठे आहे. दुष्काळ असो की, महापूर असो; संकटकाळी मदत पोहोचविण्यात या समाजाचा हातखंडा आहे. उत्तराखंड व काश्मीरमधील जलप्रलयावेळी या समाजाने कोल्हापुरातून मोठी मदत केली. मारवाडी युवा मंच व ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने तीन कोटी रुपये खर्चून फिरते कॅन्सर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरवर सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या तपासण्या केल्या जातात. १३ नोव्हेंबरपासून आतापर्यंत चार महिन्यांत राज्यात ठिकठिकाणी ३६ शिबिरे घेऊन ६८०० महिलांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८३ महिलांना कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. संस्थेतर्फे अपंगांना कृत्रिम अवयव मोफत देण्यात येतात. तसेच दोन फिरत्या मेडिकल सेंटरद्वारा खेडोपाडी जाऊन रुग्णांची मोफत तपासणी केली जाते. कंजूष नाही तर दानशूर!आपल्याकडे काहीजण कंजूष मारवाडी, चिक्कू मारवाडी असे गमतीने म्हणतात; परंतु हा समाज आता तसा राहिलेला नाही; कारण या समाजातील अलिखित नियमांनुसार प्रत्येकजण त्यांच्या उत्पन्नातील काही ठरावीक हिस्सा हा गोरगरीब समाज, मुक्या जनावरांसाठी खर्च करतो. परोपकारी वृत्ती हा या समाजाचा स्थायिभाव बनला आहे. पांजरपोळ येथील मुक्या आणि मोकाट जनावरांना या समाजाकडूनच चारा पुरविला जातो.