शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रेहानकडून मारुती जाधव चितपट

By admin | Updated: December 30, 2014 23:25 IST

चरण कुस्ती मैदान : योगेश बोबाळेचा खेळण्यास नकार

येळापूर : चरण (ता. शिराळा) येथील गजानन देवाची यात्रा व चॉँदसाहेब उरूसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीमध्ये पंजाब केसरी रेहान खानने महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव याच्यावर सहाव्या मिनिटाला गदालोट डावावर विजय मिळवून हजारो कुस्ती शौकिनांची मने जिंकली. याच क्रमांकासाठी झालेल्या दुसऱ्या कुस्तीमध्ये योगेश बोबाळे याने कुस्ती खेळण्यास नकार दिल्याने भारत कुमार केसरी परविंदरकुमार यास पंचांनी विजयी घोषित केले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी गटातील सहा मल्लांच्या तसेच उत्तर भारतातील तीनजणांच्या कुस्त्या या मैदानात घेण्यात आल्या.प्रारंभी कुस्ती मैदानाचे उद्घाटन बी. के. नायकवडी व यात्रा कमिटी अध्यक्ष नाना यशवंत नायकवडी, डॉ. ए. डी. नायकवडी यांच्याहस्ते करण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी दोन कुस्त्या घेण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र सुळने पंजाब केसरी मनप्रित सिंग याच्यावर एकलंगी भरून नागपट्टी डावावर, तर दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या विजय गुटाळ याने सातारच्या अमोल फडतरे यास घिस्सा डावावर चितपट केले. प्रेक्षणीय लढतीमध्ये ज्ञानेश्वर हांडे, संजय जाधव, दत्ता नरळे, विक्रम चव्हाण, अजय निकम, सुरेश चव्हाण यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. त्यांच्यावर कुस्ती शौकिनांनी बक्षिसांचा वर्षाव केला.मैदानातील विजयी मल्ल असे- नामदेव केसरे, अक्षय जाधव, चेतन पाटील, पप्पू मिस्किन, कुमार पाटील, प्रदीप माने, अनिल नायकवडी, नितीन माने, किरण शेडगे, अक्षय सूर्यवंशी, अरविंद पाटील, संग्राम नायकवडी, सूरज इंगळे, सूरज पाटील, रोहित इंगळे, उमेश नायकवडी, सागर घोडे, अमर पाटील, मारुती सावंत, प्रकाश जाधव, चेतन पाटील, दत्ता बनकर, संग्राम पावले, प्रवीण माने, प्रदीप पाटील, अमोल माने, प्रशांत पाटील, वैभव लोहार, कपिल पाटील. मैदानात आमदार शिवाजीराव नाईक, ‘हुतात्मा’चे मार्गदर्शक वैभव नायकवडी, डी. आर. जाधव, रणधीर नाईक, माथाडी नेते बबनराव चिंचोळकर, डॉ. संजय कुंभार, रंगराव शेडगे, मोहन पाटील, सुखदेव पाटील, उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड, उपसरपंच लक्ष्मण पाटील, तैय्यब नायकवडी, लक्ष्मण डुबल, हरिबा लोहार उपस्थित होते. बंडा पाटील-रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, दत्ता आंदळकर, नंदकुमार पाटील, भास्कर नायकवडी, विजय मुझुमले यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर ईश्वरा पाटील यांनी निवेदन केले. (वार्ताहर)