शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयास २५ वर्षे घरफाळाच नाही

By admin | Updated: June 26, 2015 01:06 IST

भूपाल शेटे : अधिकाऱ्यांनी ७० लाखांचा ढपला पाडला; फौजदारी दाखल करणार

कोल्हापूर : महापालिकेच्या ताराराणी विभागीय कार्यालयाशेजारीच असलेल्या अक्षता मंगल कार्यालयाने गेली २५ वर्षे घरफाळाच भरलेला नाही. करनिर्धारण अधिकाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेचे तब्बल ७० लाखांचे नुकसान केले आहे. यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई न केल्यास महिनाभरात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा शेटे यांनी दिला आहे.स्टेशन रोडवरील मिळकत क्रमांक ५१७/ब येथील यात्री निवास व अक्षता मंगल कार्यालय या मिळकतींची घरफाळा विभागात (असेसमेंट नोंद) नोंदच आढळून येत नाही. १९९८ पासून या मिळकतींचा मालमत्ता कर भरलेला तपशील आढळत नाही. दरम्यान, मिळकतीचे असेसमेंट करून कराची आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने करून संबंधितांकडून ती वसूूल करावी, अशी नोटीस १० दिवसांपूर्वी पाठविली असल्याचे करनिर्धारण अधिकारी दिवाकर कारंडे यांनी नगरसेवक भूपाल शेटे यांना (व. शि. १/९१/२०१५/दि. २३-०६-२०१५) लेखी पत्राद्वारे कळविले आहे.मिळकतधारक रवींद्र प्रभू यांचेकडून दंडासह रकमेची वसुली झाली पाहिजे. या मिळकतीचा घरफाळा न घेण्यास जबाबदार असलेल्या तत्कालीन सर्जेराव चव्हाण, विजय कराळ, संजय भोसले, दिलीप कोळी, दिवाकर कारंडे या अधिकाऱ्यांवर, तसेच कर्मचाऱ्यांवर परतफेडीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे. महापालिकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या या अधिकारी व मिळकतधारकाविरोधात फौजदारी दाखल करणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आयुक्त कोणती भूमिका घेणार?घरफाळा विभागातील दररोज एक घोटाळा पुढे येत आहे. शहरातील तीन हजारांहून अधिक मिळकतधारकांना बेकायदेशीर दंड व व्याजाच्या रकमेत सूट देत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी महापालिकेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. आता या नव्या घोटाळ्याप्रकरणी आयुक्त कोणती भूमिका घेणार, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.