शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची गाठ मृत्यूनंतरही कायम..!

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

भडगाव येथील दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू

गडहिंग्लज : गंभीर आजारी असणाऱ्या पत्नीला मृत्यूच्या दाढेतून आपण आता वाचवू शकणार नाही, याची हाय खाऊन दवाखान्यातच पतीचा मृत्यू झाला, तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून नातेवाईक घरी परतण्याआधीच पत्नीनेही दवाखान्यात जीवनयात्रा संपविली. मंगळवारी (दि. २७) येथील उपजिल्हा रुग्णालयात ही हृदयद्रावक घटना घडली असून, लक्ष्मीबाई मारुती पट्टणकुडी (वय ५५) आणि मारुती कल्लाप्पा पट्टणकुडी (६५, रा. भडगाव) अशी या दुर्दैवी दाम्पत्याची नावे आहेत.दि. २० रोजी दसऱ्याचा फराळ घेऊन लक्ष्मीबाई जरळी येथील नाईकवाडी वसाहतीत राहणाऱ्या दोन विवाहित मुलींकडे भडगावमधून चालत निघाल्या होत्या. दम्याच्या त्रासामुळे वाटेतच भोवळ येऊन पडल्यानंतर मुलींनीच त्यांना गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे पती मारुती हे सुश्रूषा करीत होते; पण लक्ष्मीबाई यांचा आजार बळावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याची सूचना डॉक्टरांनी केली. नातेवाइकांनी लक्ष्मीबाई यांना मंगळवारी (दि. २७) सकाळी कोल्हापूर येथे हलविण्याची तयारी केली; पण बेताची आर्थिक स्थिती आणि न परवडणाऱ्या खर्चाचा विचार करीत रुग्णालयात जेवण घेऊन आलेल्या मारुती यांना भोवळ आली आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.लक्ष्मीबाई यांना कोल्हापूरला नेण्याचे तात्पुरते स्थगित करून मारुती यांच्यावर नातेवाइकांनी भडगाव येथील बेरड समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. जड अंत:करणाने परतणारे नातेवाईक घरी पोहोचण्याआधीच लक्ष्मीबार्इंचीही रुग्णालयात प्राणज्योत मालवली. पुन्हा संध्याकाळी उशिरा त्यांचाही मृतदेह मारुती यांच्या शेजारीच दफन करण्यात आला. मात्र, एकाच दिवशी एका पाठोपाठ झालेल्या दोघांच्या मृत्यूने भडगाव गावावर शोककळा पसरली. (वार्ताहर)