शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची गोष्ट; स्वागताच्या हजारो पोस्ट

By admin | Updated: December 23, 2016 01:06 IST

स्त्री शक्तीचा सन्मान : ६१८० इ मेल, १४६४ व्हॉटस् अप मेसेज, शेकडो कॉल

भरत बुटाले -- कोल्हापूर---कोणतेही कार्य असो त्याला शुद्ध हेतूची जोड असेल, तर समाजात त्याचे जोरदार स्वागत होणारच, याची प्रचिती सातारा येथील सत्यम गुजर यांच्या नियोजित विवाहसोहळ्याच्या निमित्ताने येत आहे. १८ डिसेंबर २०१६ च्या ‘लोकमत’मध्ये ‘लग्नपत्रिकेसह सोहळ्यात स्त्री शक्तीचा सन्मान’ या मथळ्यांतर्गत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने स्वागताबरोबरच शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.‘१ रुपया समाजकार्यासाठी’ हा उपक्रम सत्यात उतरविलेल्या सत्यम गुजर यांचा विवाह शनिवारी (दि. २४) सातारा येथे होत आहे. लग्नपत्रिकेतील निमंत्रकापासून ते प्रत्यक्ष सोहळ्यात महिलांना अग्रस्थान देऊन त्यांनी स्त्री शक्तीचा सन्मानच केला आहे. तसेच अनावश्यक गोष्टींना फाटा देत सोहळ्यात समाजसुधारकांचे छायाचित्र, झाडांचे वाटप, १० अनाथ मुलांना भोजनाचा पहिला मान, आहेर म्हणून फक्त पुस्तकांचा स्वीकार असे वेगळेपण असणार आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्यांच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले. हे त्यांना आलेल्या इ-मेल (६,१८०), व्हॉटस् अप मेसेज (१४६४) आणि शेकडो फोन कॉलवरून दिसून येते.‘फेसबुक’चा आधारविशेष म्हणजे यातील बहुतेकांनी ‘सत्यम गुजर सातारा’ असे फेसबुकवर सर्च करून मोबाइल नंबर आणि इ-मेल अ‍ॅड्रेस मिळवून संपर्क साधला असून, ‘फेसबुक’द्वारेही त्यांच्याशी संपर्क साधून स्वागत केले आहे. गेल्या चार दिवसांत आलेल्या मेसेज, फोन कॉल आणि प्रत्यक्ष भेटणाऱ्यांकडून ‘तुम्ही या कार्यातून वेगळेपण जपत आहात. महिलांना दिलेले प्राधान्य हेच स्वागतार्ह आहे.’ असे सांगणाऱ्या प्रतिक्रिया ऐकून आणि वाचून मी खूपच भारावून गेलो असून, माझी जबाबदारीही वाढली आहे. - सत्यम गुजरतुम्ही जे कार्य करत आहात ते अगदी माझ्या मनातले असल्यासारखे आहे. असे कार्य माझ्या काही घरगुती कार्यक्रमांमध्ये करायचे होते, पण ते करू शकलो नाही. तुम्ही जे धाडस केले आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. युवा पिढी अशाप्रकारे विचार करून वागू लागली तर समाजाचे प्रबोधन होईल.- रवींद्र माटे, सातारा.