शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गूळ खरेदीत मार्केटिंग फेडरेशनने उतरावे शेतकºयांची बैठकीत मागणी : साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी ब्रँड खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:48 IST

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनने गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी गूळ उत्पादक शेतकºयांनी गुरुवारी बाजार समितीत आयोजित केलेल्या बैठकीत केली. साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी गुळाचा ब्रॅँड खराब झाल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिले. दरात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तम पाटील म्हणाले, गुळाचे उत्पादन तेवढेच राहिले; पण गूळ खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण पूर्वी घरात किती गूळ खात होतो आणि आता किती खातो, यासाठी गुळाचे मार्केटिंग व्हायला पाहिजे. बाजार समितीने पुढाकार घेऊन गुळातील पोषक घटकांचे मार्केटिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा. साखरमिश्रित गुळाचे प्रमाण वाढल्याचे सांगत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे म्हणाले, गुजरातमध्ये गूळ शीतगृहात ठेवला जातो. साखरमिश्रित गूळ शीतगृहात वितळत असल्याने कोल्हापूरचे नाव खराब होऊन मागणी कमी होत आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून राधानगरी तालुक्यातील चांदेचा गूळ कºहाडच्या मार्केटमध्ये जातो. तिथे चांगला दर मिळतो. मग येथे काय झाले?

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्यातील वजनदार नेते आहेत. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला असताना त्यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी दादासाहेब पाटील यांनी केली. केवळ मुहूर्ताच्या सौद्याला तुम्ही हजर राहू नका. रोज सौद्यात या, किमान तीनशे-चारशे रुपयांचा दरात फरक पडेल, अशी सूचना तानाजी आंग्रे यांनी केली. त्यावर आजपासून सौद्यात हजर राहून दर वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही सभापती कृष्णात पाटील यांनी दिली. उपसभापती अमित कांबळे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सापले, आदी उपस्थित होते.काटेंवर शेतकरी भडकले

भगवान काटे तीन वेळा भाषणासाठी उठून तेच-तेच मुद्दा मांडत राहिल्याने शेतकरी संतप्त झाले. ‘भाषणबाजी बंद करा, दहा वर्षे हेच ऐकतोय; केवळ पेपरमध्ये नाव येण्यासाठी बोलू नका. बाजार समितीचे संचालक म्हणून दर घसरणीवर उपाय काय करणार, ते सांगा?’ असे संजय पाटील (वडणगे) यांच्यासह शेतकºयांनी सुनावले.सदाभाऊंना भेटणारगुळाच्या दराच्या घसरणीबाबत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रविवारी (दि. ७) भेट घेणार आहे. सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी करणार असल्याचे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले.गुळाची गुणवत्ता तपासणीस प्रयोगशाळा

व्यापारी गुळाच्या रव्यात चाकू मारून त्याची गुणवत्ता ठरवितात. ही पद्धत चुकीची असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर गुळाच्या प्रतवारीसाठी लवकरच प्रयोगशाळा सुरू करीत असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.