शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार कर वसुली ठेकेदारीस विक्रेत्यांचा विरोध

By admin | Updated: April 30, 2017 00:59 IST

इचलकरंजी नगरपालिका सभेबाहेर निदर्शने : वाढीव दरांच्या निविदा सत्ताधाऱ्यांकडून मंजूर

इचलकरंजी : बाजार कर वसुली खासगी ठेकेदारांमार्फत करण्याच्या विषयाला शहरातील छोट्या विक्रेत्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे हा विषय पुढील सभेत घेण्याचा निर्णय करण्यात आला. त्याचबरोबर नगराध्यक्षांनी हुकुमाने केलेली कामे, वाढीव दराच्या निविदा आदी प्रस्तावांना विरोध झाल्याने सत्तारूढ गटाने बहुमताच्या जोरावर हे विषय मंजूर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.विविध ४६ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शनिवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेच्या पाणीपुरवठा विभागाकडील विविध कामांच्या ४.९० ते ३७.५० टक्के जादा रकमेच्या निविदांना मंजुरी देण्याच्या विषयाला काँग्रेस, शाहू आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. म्हणून भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी अतिमहत्त्वाचा विषय असल्याने त्यास एकमताने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. जोरदार चर्चा झाल्यानंतर या विषयावर मतदान घेऊन तो मंजूर करून घेतला.बाजार कर वसुली खासगी मक्तेदारामार्फत करण्याच्या विषयाला शहरातील छोट्या व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, त्या विरोधात आंदोलन छेडले जात आहे. शहरातील फेरीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून सभागृहाबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी झालेल्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. सभेत या विषयाबाबत कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागले असताना हा विषय कोणतीही चर्चा न होता पुढील सभेत घेण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान, हा विषय आता पालिकेच्या सभेत पुन्हा घेतला जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी दिली. नगरपालिका शिक्षण मंडळ मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असले तरी शिक्षण मंडळात होणाऱ्या खर्चाचे धोरण ठरविण्याचे अधिकार नगरपालिका सभेला आहेत. म्हणून आगामी सभेमध्ये शिक्षण मंडळाबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी शाहू आघाडीचे विठ्ठल चोपडे यांनी केली. याला सर्वांनी संमती दर्शविली. (प्रतिनिधी)आरोग्य विभागातील भ्रष्ट रॅकेट मोडून काढण्याची मागणीशाहू आघाडीचे नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी आरोग्य खात्याकडील कर्मचारी दीपक गेजगे यांना लाचलुचपत खात्याने अटक केल्याबद्दल त्यांचे करण्यात आलेल्या निलंबनाचा विषय उपस्थित केला. त्यामध्ये आरोग्य खात्याकडे भ्रष्ट कारभार करणारे रॅकेट असून ते मोडून काढले पाहिजे, अशी मागणी केली. याला सत्तारूढ गटाचे तानाजी पोवार यांच्यासह सर्वांनी संमती दर्शविली. याबाबतचे अधिकार मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत पाटील यांनी बाहुबलीला कटाप्पाने का मारले या चर्चेच्या विषयापेक्षा वाईट चर्चा आरोग्य विभागाकडील कारभाराची आहे, अशीही टीका केली.