शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे उत्पन्न ७८ लाखांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:04 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या २०१८-१९ च्या उत्पन्नात तब्बल ७८ लाख ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या २०१८-१९ च्या उत्पन्नात तब्बल ७८ लाख १३ हजार २१९ रुपयांनी घट झाली असून, खर्चात मात्र १ कोटी ५३ लाख ८१ हजार ६५० रुपयांची वाढ झाली आहे. समितीचा उत्पन्न मिळवून देण्यात आघाडीवर असणाऱ्या कांदा-बटाटा विभागातच यंदा मोठा फटका बसला असून, गतवर्षीपेक्षा एक कोटी पाच लाख उत्पन्न कमी झाले आहे. गेले वर्षीपासून समितीच्या वाढाव्यातील घट वाढत असून, २०१७-१८ मध्ये २२ लाखांनी, तर यावर्षी ५७ लाखांनी वाढावा कमी झाला आहे.बाजार समितीत ‘गूळ-शेंग’, ‘कांदा-बटाटा-लसूण’, ‘भाजीपाला’, ‘फळे’, ‘धान्य-कडधान्य’ असे पाच प्रमुख विभाग कार्यरत आहेत. एकूणच उत्पन्नाच्या दृष्टीने हे पाच विभाग महत्त्वाचे आहेत. ‘गुळाची बाजारपेठ’ म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या विभागातून दरवर्षी सव्वादोन ते अडीच कोटींचे उत्पन्न मिळते; पण जिल्ह्यात कांदा व बटाट्याचे उत्पादन नसताना सर्वाधिक खरेदी-विक्री कोल्हापूर बाजार समितीत होते; त्यामुळे उत्पन्नातही गेले अनेक वर्षे हा विभाग पुढे होता. यंदा मात्र कांदा-बटाटा विभागाच्या उत्पन्नात तब्बल एक कोटी पाच लाख ५६ हजार ७२० रुपयांनी घट झाली आहे. त्याचा परिणाम समितीच्या एकूण उत्पन्नावर झाला आहे. कांदा व बटाट्याच्या एकूण किमतीवर एक टक्का सेस समिती घेते, यंदा दरात घसरण झाली. सरासरी ६ ते ७ रुपयांपर्यंत कांदा राहिल्याने उत्पन्न कमी झाले. त्यातच गुंतवणुकीवरील उत्पन्न ही १७ लाख ३१ हजाराने कमी झाले आहे; मात्र इतर उत्पन्नात ३६ लाख ६१ हजारांनी वाढ झाली आहे.खर्चात सभा व संचालक खर्चात सात लाख ९५ हजार ७९३ ने वाढ झाली; मात्र आस्थापना खर्चात १९ लाख ८५ हजार, तर प्रशासकीय खर्च ७६ लाख ३३ हजारांनी कमी झाला आहे.विभागनिहाय उत्पन्न असेविभाग २०१७-१८ २०१८-१९ वाढगूळ २.४२ कोटी २.४५ कोटी २.९६ लाखगूळ दंड व्याज १.५५ लाख १.७४ लाख १९ हजारकांदा-बटाटा ३.२७ कोटी २.२२ कोटी १.०५ कोटी (घट)फळे-भाजीपाला १.५८ कोटी १.६१ कोटी ३.२२ लाखफळे-भाजीपाला सौदा ७.४८ लाख ११.१० लाख ३.६१ लाखमालमत्ता २.३२ कोटी २.३९ कोटी ६.२१ लाखप्रवेश फी व इतर माल २१.५८ लाख २२.३९ लाख ८१ हजारपे अँड पार्क १६.०२ लाख ८.४२ लाख ७.६० लाख (घट)वे-ब्रीज १७.०५ लाख १७.५६ लाख ५० हजारजनावर बाजार ६.६३ लाख ५.५० लाख १.१३ लाख (घट)सुरक्षा विभाग ८३.७० लाख ७७.२३ लाख ६.४७ लाख (घट)आठवडा बाजार, आदी २.९२ लाख १.३४ लाख १.५७ लाख (घट)चिवा, बांबू ३.४८ लाख ३.२० लाख २८ हजार (घट)मलकापूर उपबाजार ३.२० लाख २.८० लाख ४० हजार (घट)लक्ष्मीपुरी धान्य बाजार १.५२ कोटी १.५० कोटी २.०३ लाख (घट)जनावरांचा बाजारपूर्वी पश्चिम महाराष्टÑात कोल्हापूरचा जनावरांचा बाजार प्रसिद्ध होता; पण कोपार्डे (ता. करवीर) येथे जनावरांचा बाजार झाल्यानंतर समितीतील बाजार आतबट्ट्यात आला आहे. आता तर तिथे शेळ्या-मेंढ्यांचाच बाजार भरतो.समितीच्या ठेवी ‘जैसे थे!’समिती प्रशासन वाढाव्याची रक्कम ठेवरूपाने गुंतवणूक करते; पण गेले दोन वर्षे वाढाव्याची रक्कम सोयी-सुविधांवर खर्च होत असल्याने सात कोटी ७२ लाख २७ हजार ८८३ रुपयांच्या ठेवी कायम आहेत.