शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीही ‘स्मार्ट’ होणार

By admin | Updated: November 16, 2015 00:29 IST

पणन मंडळाकडे ४० कोटींचा प्रस्ताव : कोल्हापूर विभागातून संधी शक्य

कोल्हापूर : राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने एक-एक पाऊल टाकण्यास सुरुवात केली असून, समित्यांच्या पायाभूत सुविधांसाठी खास निधी देण्यात येणार आहे. ‘स्मार्ट’ शहराच्या धर्तीवर स्मार्ट बाजार समित्या करण्याची पणन मंडळाची संकल्पना असून, यामध्ये कोल्हापूर विभागातून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवड होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत ‘पणन’ने प्रस्ताव मागविला असून, ४० कोटींचा प्रस्ताव समितीने सादर केला आहे. बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री व त्यातून मिळणारा सेस एवढेच त्यांचे उत्पन्न आहे. अनेक बाजार समित्यांचे उत्पन्न कमी असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार भागविणे अवघड झाले आहे. पगारावरच खर्च होत असल्याने समितीमधील पायाभूत सुविधांची वानवा झालेली दिसते. रस्ते, गटारी यांचा तर बोजवारा उडालेला दिसतो. यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने बाजार समितींना ‘स्मार्ट’ करण्याचे धोरण पणन मंडळाने हाती घेतले आहे. प्रत्येक विभागातून दोन अशा १८ समित्या पहिल्या टप्प्यात स्मार्ट केल्या जाणार आहेत. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील बाजार समित्यांचा समावेश होतो. ‘पणन’ मंडळाने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडून मे मध्येच प्रस्ताव मागविला आहे. समितीने ४० कोटींचा प्रस्ताव सादर केला असून यामधून कागल येथील मोकळ्या जागेत गोडावून, मार्केट यार्ड येथील मुख्य कार्यालय आवार व विविध मार्केटमधील रस्ते, गटारींसह पायाभूत सुविधा यामध्ये सुचविल्या आहेत. पणन मंडळाचे धोरण पाहिले तर कोल्हापूर बाजार समितीची ‘स्मार्ट’ मध्ये निवड निश्चित मानली जाते. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जिल्ह्यातील बाजार समिती असल्याने कोल्हापूरचा समावेश होण्यात कोणतीही अडचण वाटत नाही. त्यात जिल्ह्यातून केवळ कोल्हापूर बाजार समितीचाच प्रस्ताव ‘पणन’कडे गेल्याने निवड निश्चित मानली जाते.