शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजीपाला उधळला

By admin | Updated: June 5, 2017 17:02 IST

शिल्लक माल विक्री रोखली : समितीत तणाव

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0५ : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी शिल्लक माल विक्री करताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तो रोखला. टोमॅटो, बटाट्यासह इतर भाजीपाला अक्षरश: उधळून लावल्याने समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा देण्यासाठी सोमवारी सौदे बंद ठेवले होते. पण रविवारी शिल्लक राहिलेला मालाची विक्री सोमवारी सकाळी सुरू होती. त्यावेळी युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांच्यांसह इतर कार्यकर्त्यांनी ती रोखली. ‘बंद म्हणजे बंद’, ‘शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणाबाजी करत अ‍ॅड. शिंदे यांनी विक्रीसाठी ठेवलेला टोमॅटो, लिंबू, बटाटा उधळून लावला. शिंदे यांनी अचानकपणे उचलाउचली सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांसह बाजार समिती कर्मचाऱ्यांनाही काही वेळ सुचेना,अखेर व्यापाऱ्यांनी शिंदे यांना थांबवून समजावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा रविवारी शिल्लक राहिलेला मालाची विक्री करत आहे, सोमवारी माल आलेलाच नाही. अडते-व्यापाऱ्यांचा शेतकरी संपास पाठींबा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन माल विक्री बंद करा अन्यथा उधळून लावू, असा इशारा दिला. अखेर पोलीसांनी हस्तक्षेप करून शिंदे यांना समिती आवारातून बाहेर काढले. त्यानंतर आदम मुजावर, मकरंद कुलकर्णी आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिनी मार्केट मधील भाजीपाला विक्री रोखली. तेथील माल उधळून लावल्याने पुन्हा गोंधळ उडाला.

व्यापारी व शिंदे यांच्यात बाचाबाची!

अ‍ॅड. शिंदे यांनी शेतीमाला विस्कटण्यास सुरूवात केल्यानंतर व्यापाऱ्यांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली. यावेळी व्यापारी व शिंदे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. 

आंदोलन सरकारच्या दारात करा

शेतकऱ्यांच्या जीवावरच आम्ही आहे. त्यांना चार पैसे जादा मिळाले पाहिजेत, यासाठी आमचाही प्रयत्न असतो. पण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मालाची नासधूस करून काय मिळवत आहेत. त्यांनी सरकारच्या दारात जाऊन आंदोलन करावे. अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी संपाला आमचा पाठींबा आहे, रविवारचा शिल्लक माल विक्री करण्याची जबाबदारी आमची होती. पण माणिक शिंदे अचानकपणे येऊन शेतीमालाची नासधूस करू लागले हे योग्य नाही. -जमीर बागवान, अध्यक्ष,महालक्ष्मी भाजीपाला असोसिएशन