शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ मल्लांना दोन दिवसांत मानधन : फरताडे विभागीय संकुलप्रश्नी क्रीडा आयुक्तांना तातडीने पाठविले पत्र

By admin | Updated: May 14, 2014 00:51 IST

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्येष्ठ मल्ल आणि खेळाडूंच्या बँक खात्यांवर दोन दिवसांत या मानधनाची रक्कम जमा होणार आहे.

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्येष्ठ मल्ल आणि खेळाडूंच्या बँक खात्यांवर दोन दिवसांत या मानधनाची रक्कम जमा होणार आहे. संबंधितांचे मानधन अदा करण्याबाबतचे लेखी पत्र क्रीडा व युवक संचालनालयाकडून मिळाले आहे. शिवाय विभागीय क्रीडासंकुलाच्या कामातील भाववाढीच्या मुद्द्याबाबत स्पष्टीकरण मिळावे यासाठी क्रीडा आयुक्त पंकजकुमार यांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे यांनी मंगळवारी (दि. १३) दिली. विभागीय क्रीडासंकुलाचे रखडलेले काम, ज्येष्ठ मल्ल व खेळाडूंचे थकीत मानधन आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था यांवर ‘लोकमत’ने प्रभावीपणे प्रकाशझोत टाकला. त्यावर शिवसेनेने सोमवारी (दि. १२) जिल्हा क्रीडा कार्यालयात आंदोलन केले. ‘लोकमत’ने मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन क्रीडा कार्यालयाने या मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या. याबाबत फरताडे म्हणाले, ज्येष्ठ मल्ल व खेळाडूंच्या गेल्या तीन वर्षांपासून थकीत असलेल्या मानधनाबाबत पुण्यातील क्रीडा व युवक संचालनालयाशी पत्रव्यवहार केला. त्याबाबतच्या कार्यवाहीचे पत्र सोमवारी (दि. १२) मिळाले आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ मल्ल व खेळाडू अशा १७ जणांचे आतापर्यंतचे एकूण १६ लाख ५७ हजार ५०० रुपये इतके मानधन अदा होणार आहे. दोन दिवसांत ते संबंधित मल्ल आणि खेळाडूंच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे क्रीडा संचालनालयाचे लेखाधिकार्‍यांनी कळविले आहे. विभागीय क्रीडासंकुलाचे बांधकाम सध्या ‘भाववाढी’च्या मुद्द्यावर अडले आहे. संकुलाच्या कामाची निविदा काढली. त्यावेळी यात भाववाढीच्या मुद्द्याची नोंद नव्हती. मात्र, गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या सुधारित अंदाजपत्रकात भाववाढ देऊ नये, अशी नोंद केली आहे. त्यावर मार्गदर्शन मिळावे यासाठी क्रीडा आयुक्त पंकजकुमार यांना २८ एप्रिल २०१४ रोजी पत्र पाठविले आहे. त्यांनी याबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय देण्यात येईल, असे कळविले आहे. भाववाढीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण मिळाल्यानंतर संकुलाच्या कामकाजाबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल. (प्रतिनिधी)