शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST

कोल्हापूर : संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. ...

कोल्हापूर : संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पदच्युत केल्यानंतर कोर्टकचेऱ्या सुरू आहेत. त्यात रंगभूमी दिनानिमित्त आयोजित शनिवारची सभा रद्द करण्यात आल्याने नियामक मंडळ सदस्यांनी कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.

मनमानी कारभार, मर्जीतल्यांनाच परिषदेतर्फे अर्थसहाय्य, कार्यकारिणीला विश्वासात न घेणे या कारणांवरून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १८ फेब्रुवारीच्या नियामक मंडळ सभेत अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना पदच्युत करण्यात आले. त्यांच्या जागी नरेश गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, कांबळी यांनी न्यायालयात दाद मागितली जो अर्ज फेटाळण्यात आला. या कालावधीत प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी परिषदेच्या लेटरहेडवर विश्वस्तांना मानहानीकारक पत्र पाठविले आहे. राज्यातील नाट्यगृहे सुरू झाली असताना मराठी रंगभूमीच्या मध्यवर्ती संघटनेचे यशवंत नाट्य संकुल फायरची परवानगी नाही असे सांगून बंद ठेवले आहे. असे असेल तर अडीच तीन वर्षांत फायरचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता नाट्यसंकुल कसे चालविले हा प्रश्न आहे.

नियामक मंडळ सदस्यांनी घटनेप्रमाणे मागणी करूनही प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सभा ठेवण्यास टाळाटाळ केली. मात्र, कांबळी यांच्या विरोधात निकाल गेल्याने पोंक्षे यांनी १७ फेब्रुवारीला परिषदेची सभा २७ मार्च रोजी होईल असे जाहीर केले. ही सभा हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. ज्यात आधीच्या सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी होणार होती. या कारणास्तव पोंक्षे यांनी शनिवारची सभा कोरोनाचे कारण सांगून रद्द केली. या प्रकारांमुळे नियामक मंडळाच्या सदस्यांनी कांबळी व पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.

--