शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा विद्यार्थी वसतिगृहाला अखेर मुहूर्त सापडला ‘लोकमत’चा प्रभाव : शुक्रवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:53 IST

कोल्हापूर: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा प्रारंभ शुक्रवार (दि. ३) पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात या वसतिगृहात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान असलेल्या विचारेमाळ येथील इमारतीची दुरुस्ती करून ...

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात २२ जणांना प्रवेश; व्यवस्थापनासाठी ५ स्वयंसेवी संस्थांचे अर्ज

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा प्रारंभ शुक्रवार (दि. ३) पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात या वसतिगृहात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान असलेल्या विचारेमाळ येथील इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली आहे.या वसतिगृहातील प्रवेशासाठी जिल्हा प्रशासनाकडे ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूरमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या वसतिगृहात २४ विद्यार्थ्यांसाठी निवासाच्या सुविधेचे काम पूर्ण झाले. उर्वरित काम सुरू आहे; त्यामुळे पहिल्या टप्प्यात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

या वसतिगृहाचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील पाच नोंदणीकृत संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी करून त्यापैकी एका संस्थेची निवड केली जाईल.या प्रक्रियेला विलंब झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शुक्रवार (दि. ३) दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वसतिगृहाचे उद्घाटन केले जाणार आहे. उद्घाटनाच्या दिवसापासून संबंधित २२ विद्यार्थ्यांना याठिकाणी राहता येणार आहे.शहराबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेशया वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश, प्रारंभाबाबत अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी वसतिगृहाचा प्रारंभ होणार असल्याचे सदस्य सचिव प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. ते म्हणाले, वसतिगृहासाठी ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांपैकी २२ जणांची प्रवेशासाठी निवड केली आहे. खुल्या प्रवर्गातील, कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणाºया आणि कोल्हापूर शहराबाहेरील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. वसतिगृह व्यवस्थापनासाठी नोंदणीकृत पाच संस्थांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी लवकरच पूर्ण केली जाईल.

या वसतिगृहाच्या प्रारंभाला विलंब झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने रविवारच्या (२९ जुलै) अंकामध्ये ‘मराठा वसतिगृहाबाबतची पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटली’ या वृत्ताद्वारे मांडले होते.