शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी बंदला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:45 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनावेळी औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाचा निषेधही करण्यात आला. बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना अनेक ठिकाणी एसटीबसेवर दगडफेकीचे प्रकार घडले. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. बंदमुळे अनेक मार्गावरील एसटी वाहतूक ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनावेळी औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाचा निषेधही करण्यात आला. बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना अनेक ठिकाणी एसटीबसेवर दगडफेकीचे प्रकार घडले. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. बंदमुळे अनेक मार्गावरील एसटी वाहतूक विस्कळीत झाली.नूल, पाटणे फाट्यावरकडकडीत बंदगडहिंग्लज : गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत राज्यव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नूल, महागाव, कोवाड, हलकर्णी व पाटणे फाट्यावर कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शासनाचा निषेध नोंदवून मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, आजरा येथील व्यापाऱ्यांनी सकाळी काही वेळ व्यवहार बंद ठेवले.नूल येथे कडकडीत बंदनूल : येथील बसस्टँडवर सर्वपक्षीय सभा झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा निषेध नोंदवून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. येथील शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.महागाव येथे कडकडीत बंदमहागाव : मराठा क्रांती मोर्चाच्या येथील कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार बंद ठेवून ‘बंद’ला पाठिंबा देण्यात आला.कोवाडला कडकडीत बंदकोवाड : मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी येथील व्यापारी आणि ग्रामस्थांनी उर्त्स्फूतपणे सर्व व्यवहार बंद ठेवून राज्यव्यापी बंदला पाठिंबा दिला. हलकर्णी फाटा आणि पाटणे फाटा येथील व्यापाºयांनीही उर्त्स्फूतपणे बंद पाळून राज्यव्यापी बंदला पाठिंबा दिला.आजºयात व्यापाºयांचा पाठिंबाआजरा : राज्यव्यापी बंदच्या आवाहनानुसार येथील व्यापाºयांनी सकाळी काही काळ आपले व्यवहार बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, आदींनी बंदचे आवाहन केले.कोल्हापूर-गारगोटीमहामार्गावर रास्ता रोकोगारगोटी : मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी गारगोटी शहरासह तालुक्यातील मडिलगे बुद्रुक, कूर, कडगाव, पिंपळगाव, पाटगाव, आदी प्रमुख गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला. मराठा क्रांती संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, तालुका संघटक सतीश जाधव यांनी गारगोटी ‘बंद’साठी आवाहन केले होते. गारगोटी बंद करण्यासाठी मराठा क्रांती संघटनेने व शहरातील नागरिकांनी गारगोटी शहरातून रॅली काढली. हुतात्मा चौकातून मराठा समाजातील कार्यकर्ते एस.टी. स्टँडकडे गेले व गारगोटी आगारप्रमुखांना एस.टी.सेवा बंद करण्याची विनंती केली. यावेळी आगारप्रमुखांनी एस.टी. सेवा बंद केली. सुमारे तीन तास पिसे पेट्रोलपंपानजीक चक्काजाम करण्यात आले. आंदोलनात शिवराज देसाई, मराठा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, संघटक सतीश जाधव, तालुका उपप्रमुख तुकाराम देसाई, संदीपराज देसाई, आदी उपस्थित होते.कोल्हापूर-सांगली मार्गावर दोन बसेस फोडल्याजयसिंगपूर : मराठा आरक्षणावरून सकल मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या शिरोळ तालुका बंदला प्रतिसाद मिळाला. मात्र, या आंदोलनाचे पडसाद शिरोळ तालुक्यात उमटले. यामध्ये तमदलगे येथे दोन, तर जयसिंगपूर येथे एका एस.टी.वर अज्ञातांनी दगडफेक करून नुकसान केले. दगडफेकीत एस.टी.चे ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे येणाºया सांगोला आगाराच्या एस.टी.(एमएच ११ बीसी ९४५१) वर अज्ञातांनी दगडफेक केली. न्यायालयासमोर असणाºया बस थांब्यावर दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी अडीचच्या सुमारास तमदलगे येथे कुडाळ आगाराची एस.टी. (एमएच १४ बीटी ४१६०) व कोल्हापूर आगाराची एस.टी. (एमएच १४ बीटी ३१०१) वर अज्ञातांनी दगडफेक करून दर्शनीबाजूच्या काचा फुटल्याने एस.टी.चे नुकसान झाले.