शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाची २६ ला मंत्रालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:46 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या ...

कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या वतीने २६ नोव्हेंबरला हजारो चारचाकी वाहने घेऊन मंत्रालयावर धडक देणार आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही, अशी माहिती सकल मराठा समाज कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आता सरकारचे दिवस भरले असून, अजून जास्त काळ ते समाजाला फसवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस, एक तर आरक्षण द्या; अन्यथा चालते व्हा, असा इशाराही त्यांनी दिला.मुळीक म्हणाले, मागासवर्गीय समिती न्यायालयात अहवाल सादर करणार असताना तत्पूर्वी प्रसारमाध्यमांतून समितीचा अहवाल फुटतोच कसा? सरकारच्या हेतूविषयी आम्हाला शंका येत आहे. दसरा चौकातून निघणाऱ्या मोर्चात राज्यातून हजारो गाड्या सहभागी होणार असल्याने मुंबईची कोंडी होईल.दिलीप देसाई म्हणाले, समाजाच्या २२ मागण्या मान्य असल्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले; पण पुढे काहीच झाले नाही. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’ला निधी दिल्याचा डांगोरा पिटला; पण किती तरुणांना लाभ झाला?इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, मराठा आणि कुणबी यांमध्ये फूट पाडून आरक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाचच दिवस चालणार आहे. तेथे अजेंड्यावर आरक्षणाचा विषय नसल्याने सरकारची नियत चांगली दिसत नाही. यावेळी गुलाबराव घोरपडे, स्वप्निल पार्टे, इंद्रजित माने, आकाश पाटील, शरद साळुंखे, दिलीप सावंत उपस्थित होते.शाहू छत्रपती करणार नेतृत्वदसरा चौकातून २६ नोव्हेंबरला निघणाºया मोर्चाचे नेतृत्व शाहू छत्रपती करणार आहेत. त्यांच्यासह ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह खासदार, आमदार यामध्ये सहभागी होणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.मराठ्यांचा संयम बघितला; आता ‘क्रांती’सरकारने मराठा समाजाची चेष्टा केली. आतापर्यंत आमचा संयम बघितला. आता ‘क्रांती’ या शब्दाची ताकद दाखवू. भले आम्हाला नक्षलवादी ठरवा; आम्ही घरावर तुळशीपत्रे ठेवूनच रिंगणात उतरलो आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिला....तर पोस्टर फाडूमागासवर्गीय समितीचा अहवाल सादर केल्यानंतर भाजपच्या वतीने श्रेयवादाची पोस्टरबाजी सुरू होईल; पण टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय अशी पोस्टरबाजी केली तर ते पोस्टर फाडू, असा इशारा दिलीप देसाई यांनी दिला.