शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला पदोन्नतीत डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध अधिकारी पदाच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मराठा समाजातील कर्मचाºयांना डावलल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केला. या प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. ...

ठळक मुद्देमराठा समाजाचे शिष्टमंडळ व विद्यापीठाच्या बिंदूनामावली समितीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध अधिकारी पदाच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मराठा समाजातील कर्मचाºयांना डावलल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केला. या प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. विद्यापीठातील या पद्दोनतीच्या प्रकरणांबाबत अपुरी माहिती, असमाधानकारक उत्तरे देणाºया विद्यापीठ प्रशासनाच्या प्रतिनिधींना या शिष्टमंडळाने धारेवर धरले.विद्यापीठात मंगळवारी दुपारी सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ व विद्यापीठाच्या बिंदूनामावली समितीची बैठक झाली. यावेळी उपकुलसचिव पदांची पदोन्नती आणि भरती प्रक्रिया ही शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून झाली आहे. खुल्या प्रवर्गासह मराठा समाजाला डावलण्यात आले आहे, असा आरोप या शिष्टमंडळाने केला. आमचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही. मात्र, राज्यघटना, कायद्याने जे खुल्या प्रवर्गाला दिले आहे ते मिळाले पाहिजे. नोकरभरती आणि पदोन्नतीमध्ये ५२ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये, अशी तरतूद राज्यघटनेनुसार करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने १८ आॅक्टोबर १९९७ च्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सरळसेवा भरती आणि पदोन्नतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी ३२ टक्क्यांहून जास्त केली आहे. त्यामुळे पदोन्नती, भरती प्रक्रियेची चौकशी व पुनर्अभ्यास करून बिंदूनामावली समितीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील शिष्टमंडळाने दिला. यावर प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी याबाबतीत ४ आणि १२ आॅगस्टला मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि बिंदूनामावली समितीची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, बिंदूनामावली समितीचे अध्यक्ष प्रकाश राऊत, उपकुलसचिव पी. एस. सोयम, अ‍ॅड. सतीश नलवडे, दुर्गेश लिंग्रस, संग्राम निंबाळकर, बाबा पार्टे, राजू जाधव, रूपाली पाटील, वैशाली महाडिक, नितीन पाटील, कमलाकर जगदाळे, उमेश पोवार, आदी उपस्थित होते.बिंदूनामावली समितीची ४ व १२ आॅगस्टला बैठकया भरती प्रक्रियेची शहानिशा करण्यासाठी पूर्वी १७ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर समितीत अ‍ॅड. सतीश नलावडे, सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळातील प्रा. जयंत पाटील, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, फत्तेसिंग सावंत यांचा समावेश करण्यात आला. या समितीची बैठक ४ आणि १२ आॅगस्टला होणार आहे.विद्यापीठाचे प्रतिनिधी निरुत्तरपदोन्नती, भरती प्रक्रियेबाबत विद्यापीठाचे प्रतिनिधी या बैठकीत माहिती देत होते. मात्र, ते देत असलेली माहिती अपुरी असल्याचे लक्षात येताच ‘आधी पूर्ण माहिती घ्या आणि मग बोला’, अशा शब्दांत सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने सुनावले. शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर विद्यापीठाचे प्रतिनिधी निरुत्तर झाले.