शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘मराठा भवन’ शासनच बांधून देणार

By admin | Updated: December 30, 2014 00:15 IST

राजेश क्षीरसागर यांची ग्वाही : मराठा दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या संस्थानाच्या ठिकाणी मराठा समाजाचे भवन नाही, ही शोकांतिका आहे. कोल्हापुरातील मराठा भवन जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, बांधकामाची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. मराठा महासंघाच्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील होते. आमदार क्षीरसागर म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत युतीचे सरकार सकारात्मक आहे. १६ ऐवजी २० टक्के आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, ते मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. गंभीर आजारांचा उपचार मोफत करणार असून, औषधाचा खर्चही संबंधितांना करू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनात पहिल्यांदा उतरणारा मी पहिला दलित आमदार असून, हा सर्व शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव आहे. कोणत्याही समाजाचा स्तर उंचावण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविकात दिनदर्शिका काढण्यामागचा हेतू स्पष्ट केला. मराठा आरक्षणासाठी शांत डोक्याने लढा दिला, त्याला यशही आले. केवळ आरक्षणाच्या कामावर न थांबता मराठा समाजाला अनिष्ट रूढी, परंपरेतून बाहेर काढण्याचे काम करावे लागणार आहे. समाज विज्ञाननिष्ठ झाला तरच प्रगती करू शकतो, याची जाणीव-जागृती करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डी. जी. पाटील, प्रताप साळोखे, उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही. बी. पाटील, बबनराव रानगे, मोहन कुशिरे, राजू मेवेकरी, दीपाली पाटील, संयोगीता पाटील उपस्थित होते. शैलजा भोसले यांनी आभार मानले. ‘मराठा भवन’लाभरभरून मदतमराठा स्वराज्य भवन बांधकामासाठी कार्यक्रमस्थळी संजय वाईकर यांनी ११, तर सीमा पाटील यांनी २१ हजार रुपये मदत दिली. कार्यक्रम संपेपर्यंत २ लाख ८७ हजार रुपयांची मदत गोळा झाल्याचे संयोजकांनी जाहीर केले.