शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा जागृती मेळावा १५ आॅक्टोबरला--मराठा महासंघाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:17 IST

कोल्हापूर : महाराष्टÑातील खासदार, आमदारांचे मराठा समाजाकडे दुुर्लक्ष झाल्याकडे लक्ष वेधत

ठळक मुद्दे ‘मराठा भवन’ची संकल्पना घराघरांत मांडामराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जे माफ करावीत, अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑातील खासदार, आमदारांचे मराठा समाजाकडे दुुर्लक्ष झाल्याकडे लक्ष वेधत मराठा क्रांती मोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त १५ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मराठा जागृती मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक हे होते.

कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा निघून १५ आॅक्टोबर रोजी वर्ष पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक मोर्चाची फलनिष्पत्ती काय? असा प्रश्न विचारला जात आहे, असे सांगून वसंतराव मुळीक म्हणाले, आता हाच प्रश्न घेऊन समाजासमोर जायचे आहे. मराठा भवन, मराठा समाजाची शैक्षणिक कर्जे माफ करा ह्या मागण्या आहेत. कोल्हापुरात मराठा भवन उभारण्याचा संकल्प आहे. भवनसाठी निधी संकलनाचे काम पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येकाने घराघरांत जाऊन ‘मराठा भवन’ ही संकल्पना मांडण्याची गरज आहे. १५ आॅक्टोबर रोजी मराठा जागृती मेळाव्यात सर्व संघटनांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही मुळीक यांनी सांगितले.

प्रारंभी डॉ. संदीप पाटील यांनी, सर्व संघटनांना एकत्र आणावे व १५ आॅक्टोबरच्या मेळाव्याबाबत लोकप्रतिनिधींकडे जागर करावा, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रसंगी आमरण उपोषण करावे, असे सुचविले. यावेळी शैलेजा जाधव म्हणाल्या, संपूर्ण जिल्हाभर महिला मराठा ब्रिगेडच्या शाखा जास्तीत जास्त सुरू कराव्यात. विजय पाटील यांनी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जे माफ करावीत, अशी मागणी केली. यावेळी सचिन पाटील, शैलेजा भोसले, निर्मला यादव, आदींनीही सूचना मांडल्या. याप्रसंगी शंकरराव शेळके, व्ही. के. पाटील, आदी उपस्थित होते.‘मराठा भवन’साठी दबावगट करामराठा भवन उभारणीसाठी निधी संकलन होत असले तरीही एक दबावगट निर्माण केला पाहिजे. गरज पडल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन वसंतराव मुळीक आणि डॉ. संदीप पाटील यांनी यावेळी केले.