शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सेव्ह मेरिट...’च्या पत्रावरून मराठा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचा फलक फाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रलंबित भरती प्रक्रियांबाबत अपेक्षित कार्यवाहीचे पत्र सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेने ...

कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रलंबित भरती प्रक्रियांबाबत अपेक्षित कार्यवाहीचे पत्र सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रावर नाव असणाऱ्या डॉ. तन्मय व्होरा यांच्या लक्ष्मीपुरी येथील हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी तेथील फलक फाडला. मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र मराठा समाजाच्या विरोधात असल्याने ते मागे घ्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या पत्रावर डॉ. व्होरा यांचे नाव असल्याने याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यासाठी क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. डॉ. व्होरा यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, तरच आंदोलन थांबविण्यात येईल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावर डॉ. व्होरा यांनी म्हणणे मांडल्यानंतर आंदोलन थांबले.

या आंदोलनात सचिन तोडकर, दिलीप पाटील, नितीन देसाई, भास्कर पाटील आदी सहभागी झाले. दरम्यान, मराठा समाजाचे कार्यकर्ते माझ्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संस्थेने मुख्यमंत्री यांना पाठविलेले पत्र आणि त्यातील मजकूर मला समजला. त्या मजकुराशी मी सहमत नाही. ते पत्र सादर करताना या संस्थेने माझ्याशी व्यक्तिश: अथवा कोणत्याही प्रकारचा विचारविनिमय अथवा चर्चा केली नसल्याचा खुलासा डॉ. तन्मय व्होरा यांनी पत्रकाद्वारे केला.

चौकट

मराठा आरक्षणास माझा पाठिंबा

या संस्थेच्या लेटरहेडवर माझे नाव आहे. परंतु, या पत्राच्या विषयासंदर्भात संस्थेने मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता, माझे मत विचारात न घेता ते मुख्यमंत्री कार्यालयात दिले आहे. या संस्थेशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. देणगी मी दिलेली नाही. या प्रकरणात मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मराठा समाजाच्या आरक्षणास माझा पाठिंबा असल्याची माहिती डॉ. व्होरा यांनी दिली.