शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकाच शाळेत एकाच विषयाचे अनेक शिक्षक

By admin | Updated: August 29, 2014 23:40 IST

शिक्षक पदाची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी, अशी मागणी शिक्षकांसह पालकांतून

कसबा तारळे : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व उच्च प्राथमिक शाळांत पटसंख्येच्या निकषानुसार विषयशिक्षक प्रक्रिया राबविली आहे; परंतु ती राबविताना प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज असताना, एकाच शाळेत एकाच विषयाच्या अनेक शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विषय शिक्षक पदाची ही प्रक्रिया पूर्णत: चुकीची असून, ती पुन्हा विचारांती राबवावी, अशी मागणी काही ज्येष्ठ शिक्षकांतून व पालकांतून होत आहे.दोन आठवड्यांपूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई.) कायद्यानुसार विषय शिक्षक प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेसाठी राबविण्यात आली. वस्तुत: विद्यार्थी पटनिश्चितीनुसार एकाच शाळेत सर्व विषयांसाठीही वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती होणे गरजेचे असताना एकाच शाळेत एकाच विषयाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षकांची नियुक्ती झाली आहे.शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई.) कायद्याचा वेगळाच अर्थ काढून घाईगडबडीत राबविलेली ही प्रक्रिया पूर्णत: चुकीची आहे. त्याचबरोबर ती सप्टेंबर २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाचा पट निश्चित करून करावयास हवी असताना तसे न करता सप्टेंबर २०१२-१३ च्या पटावर पदनिश्चिती करून संबंधित शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांत काही शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यांचे पुन्हा समायोजन कुठे करायचे हासुद्धा गुंता आहे. (वार्ताहर)ज्या-त्या विषयाचे शिक्षक प्रत्येक शाळेत नेमले तर शाळांची तसेच मुलांची गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होणार असल्याचे काही तज्ज्ञ शिक्षकांचे म्हणणे आहे. या सर्वच बाबींचा गांभीर्याने विचार करून विषय शिक्षक पदाची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी, अशी मागणी शिक्षकांसह पालकांतून होत आहे.