शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘मादळे’तील अनेकांचा जगण्याचा आधारच हरवला

By admin | Updated: July 5, 2016 00:35 IST

गावाच्या डोळ्यांत अश्रू : मालेतील अपघाताचं दु:ख कायमच उराशी

एका प्रचलित कथेनुसार कालिदास हा एक गुराखी होता. अत्यंत अज्ञानी, मूर्ख, अक्षरशत्रू. काहीसा मंदबुद्धीचा असल्याने अष्टौप्रहर तो मेंढय़ांच्या कळपात रमायचा, जे त्याला मित्र वाटायचे. त्या देशाच्या राजकन्येचे नाव विद्यावती. नावाप्रमाणेच ती विद्यावती होती. सकल शास्त्र, विद्या पंडित होती. रूपाबरोबरच पांडित्य असल्याने तिला ‘ग’ची बाधा झाली. नामांकित, प्रसिद्ध पंडितांना दरबारात बोलावून ती त्यांच्याशी विद्वत चर्चा करायची आणि त्यांना पराभूत करीत, त्यांचा अवमान करायची. ‘आपल्यापेक्षा वरचढ ठरणार्‍या पंडिताशीच विवाह करायचा’ असा तिचा पण होता.तिच्याकडून पराभूत आणि अवमानित झालेले सारे पंडित एकत्र जमले. त्यांनी एक कट केला. विद्यावतीचा तोरा उतरविण्यासाठी, तिचे लग्न एका महामूर्खाशीच घडवून आणायचे. यात त्या देशाचा अमात्यसुद्धा सामील झाला. एका महामूर्खाच्या शोधात ते लागले. एकेदिवशी त्यांना आपण बसलेल्या फांदीलाच छाटणारा एक मूर्ख दिसला. त्याच्याशी केलेल्या थोड्या संभाषणानंतर तो निश्चितच महामूर्ख असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या सार्‍यांना परमानंद झाला. त्याला उत्तम पेहरावाने, अलंकार, आभूषणांनी नटवून तयार केले. दोन शब्द, चार श्लोक मोठय़ा कष्टाने शिकविले. आता त्याला राजदरबारात नेऊन शेजारच्या देशातून एक महाविद्वान पंडित मुद्दामहून आपल्या राजकन्या विद्यावतीशी, विद्वत चर्चा करण्यासाठी आल्याचे सांगितले. कालिदासाचे तेज:पुंज रूप पाहून, सारा दरबार अवाक् झाला. अर्थात अत्यंत तातडीने ही बातमी अंत:पुरातल्या विद्यावतीला कळविण्यात आली. आता पुन्हा एका पंडिताचा पराभव करण्याची संधी मिळते आहे, या विचाराने ती तातडीने दरबारात हजर झाली. एक मोठा प्रकांड पंडित आपल्याशी चर्चा करण्यासाठी आला असल्याने आणि त्याचे नाव कालिदास आहे, असा त्याचा परिचय करून देण्यात आला. कालिदास हा रूपवान असल्याने तो महापंडितासारखा दिसत होता.विद्वत चर्चेला सुरुवात झाली. विद्यावतीचे काही कूट प्रश्न, त्याला दोन शब्द, चार श्लोक जे त्याला पढविण्यात आले. त्याच्याद्वारे काही खाणाखुणांद्वारे त्यांनी दिलेली उत्तरे अत्यंत समाधानकारक असल्याचे परीक्षक मंडळींनी घोषित केले. विद्यावतीने पराभव मान्य केला. विद्यावती फसली गेली. कालिदास हा मोठा पंडित आहे, यावर तिचा विश्वास बसला. तिचे लग्न मोठय़ा थाटामाटात कालिदासाशी झाले; पण पहिल्याच रात्री तो अत्यंत महामूर्ख नवरा मला नको म्हणत तिने त्याला अंत:पुरातून हाकलून दिले. विद्या, पांडित्य जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत तू तुझे तोंड मला दाखवू नकोस, असे तिने त्याला निक्षून सांगितले. कालिदास अत्यंत दु:खी व अपमानित होऊन बाहेर पडला. विद्यावतीने केलेल्या प्रचंड अपमानाने कष्टी होऊन कालिदास गावाच्या बाहेरच्या एका पडक्या कालिमंदिरात आला. देवीच्या पायाचा आर्शय घेऊन तो दिवस-रात्र तिची आराधना करू लागला. देवीच्या सेवेत तो अत्यंत भक्तीने एकचित्त झाला. तहान, भूक विसरून गेला. एकेदिवशी कालिमाता, कालिदासावर प्रसन्न होऊन त्याच्या पुढय़ात प्रकटली आणि म्हणाली, ‘वत्सा, कालिदासा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहे. तुला मी पांडित्य असाधारण कविताशक्ती वराच्या रूपाने देत आहे. तू यापुढे महाकवी कालिदास म्हणून या भूमंडळावर गाजवशील.. देवी अंतर्धान पावली.आता कालिदास तडक विद्यावतीच्या अंत:पुरात दाखल झाला. विद्यावतीच्या शयनकक्षेचे दार त्याने ठोठावले. तेव्हा विद्यावतीने दार न उघडताच त्याला आतून प्रश्न केला ‘अस्ति कश्चित वाक्विशेष’ (आता, सांगण्यासारखे काय तुझ्याकडे आहे?) तिने दार न उघडता प्रश्न केल्याने कालिदास नाराज होऊन तेथून निघून गेला. परंतु तिचे ते तीन शब्द त्याच्या मनावर कायमचे ठासून राहिले. आपल्या वाक्विशेषाच्या प्रतिभेने, कालिदासाने ‘अस्त’ या शब्दाने अस्त्युत्तरस्यांदिशि देवतात्मा’ने सुरुवात करून ‘कुमार संभव’ ‘वाक्’ या शब्दाने ‘वागार्थी’ विव संपृक्ता’ या वाक्याने सुरुवात करून रघुवंश तर ‘कश्चित’ या शब्दाने सुरुवात करून ‘कश्चितकांता विरह गुरूना’ म्हणत मेघदूत, अशी तीन महाकाव्ये लिहिली. अक्षरशत्रू असलेल्या कालिदासाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर अक्षरकाव्ये लिहून, कवी कुलगुरू या पदापर्यंत पोहोचला. अस्तु!- डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली