शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मिणचेकरांच्या विजयात अनेकांचा ‘हात’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

अंतर्गत घडामोडींमुळे विजय सुकर : राष्ट्रवादीची मदत; काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर

दत्ता बिडकर - हातकणंगले -राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी दुसऱ्यांदा भगवा फडकविला. त्यांच्या विजयामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी खासदार माने गटाची मदत, पेठवडगाव शहरातील कॉँग्रेस अंतर्गत जुना-नवा वाद, स्वाभिमानी संघटना कार्यकर्त्यांची उघड भूमिका, वारणा कार्यक्षेत्रातील नाराजी, हुपरीसह १३ गावांमध्ये आवाडेंचा आदेश झुगारून शिवसेनेला झालेली मदत आणि कॉँग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. कॉँग्रेस पक्षाचा बोलकिल्ला असलेला हा मतदारसंघ २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने या मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.विधानसभेमध्ये पाचवेळा प्रतिनिधित्व केलेल्या जयवंतराव आवळे यांनी ‘गाव तेथे विकास’ केला असल्याची चर्चा होते. कॉँग्रेसमुळे विकास झाला, असे सांगणारे कार्यकर्ते २००४ पासून २०१४ पर्यंत आपल्या गावावर वचक का ठेवू शकले नाहीत, याचाही विचार करण्याची गरज आहे.हातकणंगलेमध्ये खरी लढत शिवसेना-कॉँग्रेस अशीच झाली. डॉ. सुजित मिणचेकर यांनी गट-तट न पाहता विकासकामांसाठी निधी दिला. कॉँगे्रस-राष्ट्रवादीची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतींना निधी देऊन विकासकामांसाठी पुढाकार घेतला. डॉ. मिणचेकर यांनी गेल्या पाच वर्षांत दलित नेत्यांनाही जवळ केले नाही. यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र, निवडणुकीपूर्वी शिवशक्ती व भीमशक्ती एकवटल्याने शिवसेनेचा विजय सोपा झाला.राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने गटाने शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे दत्तात्रय घाटगे यांना अवघी ३,८३५ मते मिळाली. त्याचबरोबर लोकसभेला खासदार शेट्टी यांना केलेल्या मदतीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. मिणचेकरांना आता मदत केली. कॉँग्रेसचे उदेमवार जयवंतराव आवळे यांच्या प्रचाराचे ढिसाळ नियोजन, पेठवडगावमधील जुन्या कॉँग्रेसच्या नेत्यांना, माजी नगरसेवकांना जवळ करणे महागात पडले. त्यातून नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांंची नाराजी, जुन्या-नवा वादाचा फटका कॉँग्रेस उमेदवाराला बसला.वारणेच्या विरोधात नाराजीजनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या गावातच राजीव आवळे कमी पडले. नीलेवाडी-पारगाव ते कुंभोज-नरंदे या वीस ते बावीस गावांमध्ये जनसुराज्य पक्ष २००९ मध्ये पहिला होता. तो २०१४ मध्ये तिसऱ्या स्थानी गेला. वारणा दूध संघाची दूध बिले आणि ‘वारणे’चे ऊस अ‍ॅडव्हान्सचे अर्थकारण जनसुराज्यला भोवले. २००९ मध्ये ५१,१०२ मते घेणारा जनसुराज्य पक्ष २०१४ मध्ये ३२,८७४ मतांवर थांबतो, याला कोण जबाबदार? याबरोबरच उमेदवार राजीव आवळे यांचा संपर्क नाही.