शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ड’ वर्ग नियमावलीत अनेक जाचक अटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:24 IST

राजेंद्र सावंत : अन्याय झाल्यास न्यायालयात

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘ड’ वर्ग विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अनेक जाचक व विकासास बाधक असणाऱ्या अटी आहेत. ही नियमावली जशीच्या तशी लादून कोल्हापूरवर अन्याय झाल्यास न्यायालयात दाद मागणार आहे, असा इशारा असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅन्ड इंजिनिअर्सचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी दिला.असोसिएशनच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सावंत म्हणाले, राज्यातील सर्व ‘ड’ वर्ग महानगरपालिकांना सारखीच नियमावली शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या. कोल्हापूर शहराचा विकास आराखडा मंजूर होऊन व त्यावरील नियमावली अंतर्गत विकसन होऊन १६ वर्षांचा कालावधी उलटला आहे. नवीन विकास आराखडा मंजूर होणे आवश्यक असताना नवीन विकास आराखडा न करता जुन्या आराखड्याबरोबरची नियमावली रद्द करून नवीन नियमावली लागू करण्याची शासनास घाई का झाली आहे? ज्या विकास आराखड्याअंतर्गत १६ वर्षांमध्ये जुन्या नियमावली अंतर्गत झालेल्या विकसनाचा या नवीन नियमावलीमुळे निर्बंध येणार असल्याचे असोसिएशनतर्फे यापूर्वीच आपल्या शासनाकडील हरकतीमध्ये स्पष्ट केले आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसणार असून पर्यायाने महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये घट होणार आहे तसेच यामुळे फ्लॅट व घरांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे. त्याचा विचार केल्यास असोसिएशनतर्फे उपस्थित केलेल्या हरकती या कोल्हापूरबाबतीत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कार्यक्रमात प्रारंभी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आर. एस. बेरी यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष सावंत व माजी अध्यक्ष गणपतराव व्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आर्किटेक्ट सुनील पाटील, सचिन घाटगे, अभियंता रवीकिशोर माने, प्रसाद मुजुमदार, अभिजित जाधव यांनी तांत्रिकदृष्ट्या मते मांडून शासनाने दडपशाही केल्यास न्यायालयात जाण्यावाचून पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष उमेश यादव, संदीप घाटगे, राज डोंगळे, रवींद्र माने, सुनील मांजरेकर, सुधीर हंजे, महेश ढवळे, परशराम रेमानिचे, सुधीर पाटील, विजय भांबुरे, अतुल शिंदे, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष सुधीर राऊत यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)घातक नियमांची दुरुस्ती करावीआमची असोसिएशन या ‘ड’ वर्ग नियमावलीला विरोध करत असून याअंतर्गत कोल्हापूरचा आराखडा व नियमावली १६ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे नवीन नियमावली नवीन विकास आराखड्याबरोबर काही घातक नियमांची दुरुस्ती करूनच लागू करावी, अशी मागणी असोसिएशनने केली असल्याचे सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, जनतेची बाजू न्यायालयामध्ये सक्षमपणे मांडली जाईल.