शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उभारलीय ‘माणुसकीची भिंत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 00:34 IST

गोरगरिबांचा आधारवड : ‘नको असेल ते द्या... हवे असेल ते घेऊन जा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद -- गुड न्यूज

कोल्हापूर : दिवाळीनिमित्त सारे शहर आनंदात आहे, खरेदीत मग्न आहे. हे घडत असतानाच एक घटक या साऱ्यांपासून अलिप्त आहे. दिवाळी असली तरी त्याच्याकडे अंग झाकण्यापुरतेही कपडे नाहीत. हीच गोष्ट खटकली आणि काही युवकांच्या संकल्पनेतून ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरातील सीपीआर चौकात उभी राहिली. आता घरातील अधिकचे कपडे या भिंतीवर आणून ठेवले जातात. गरजू त्यांच्या मापानुसार ते घेऊन जातात. गुरुवारपासून सुरू झालेली ही भिंत गोरगरिबांसाठी आधारवड ठरते आहे. प्रसाद पाटील यांनी या भिंतीची संकल्पना ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरील एका ग्रुपवर मांडली. त्यास आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेत प्रोत्साहन दिले. यामध्ये मुस्लिम बोर्डिंग हाऊसचे चेअरमन गणी आजरेकर यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यास समाजातील मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला व दोनच दिवसांत शहरात ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने- नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या. सकाळी आठपासूनच मदतीचा ओघ सुरू होता. कोल्हापुरातील सीपीआर चौकात गुरुवारी ‘माणुसकीची भिंत’ संकल्पनेतून गोरगरिबांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, गणी आजरेकर, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.