शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मैनुद्दीन दाखविणार आज प्रात्यक्षिक

By admin | Updated: March 20, 2016 01:03 IST

मोटारसायकल, कटावणी जप्त : वारणा शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरण

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील तीन कोटी रुपयांची चोरी कशी केली याचे प्रात्यक्षिक आज, रविवारी चोरटा मैनुद्दीन मुल्ला पोलिसांना दाखविणार आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांत वापरलेली मोटारसायकल व कटावणी शनिवारी पोलिसांनी हस्तगत केली. त्याचा फरार साथीदार रेहान अन्सारी याला लवकरच अटक करू, अशी माहिती तपास अधिकारी विकास जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम मिळून आल्यानंतर वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टी डेव्हलपर्सचे मालक झुंजार माधवराव सरनोबत यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिली. कोडोली पोलिसांनी कॉलनीमधील रूमची झडती घेतली असता आणखी १ कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळून आले. सुमारे सव्वाचार कोटींची बेहिशेबी रक्कम मिळून आल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करीत आहे. शनिवारी पथकाने सांगली पोलिसांच्या ताब्यातून मैनुद्दीन याने वापरलेली मोटारसायकल व कटावणी हस्तगत केली. मैनुद्दीन याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपल्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मैनुद्दीन याने सकाळी साडेदहाच्या सुमारास चोरी केली. रस्त्याकडेला ही इमारत आहे. त्याच्यासमोरच शिक्षण मंडळाचे कार्यालय आहे. कॉलेज विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची याठिकाणी वर्दळ असते. कॉलेज परिसरात प्रवेश करायचा असेल तर प्रवेशद्वारातून सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून आत यावे लागते. असे असतानाही त्याने चोरी केली. ती कशी केली, याची रंगीत तालीम आज, रविवारी पोलिस घेणार आहेत. कार घेण्यापूर्वीच पोलिसांच्या जाळ्यात चोरीनंतर कोट्यवधी रुपये मिळाल्याने मैनुद्दीन भारावून गेला होता. तो यापूर्वी एका इनोव्हा गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. त्या मालकास त्याने भेटून ही गाडी मला खरेदी करायची आहे, कितीला देणार सांगा, असे म्हणाला. त्यावर मालकाने आठ लाख किंमत सांगितली. मैनुद्दीन याने ७ लाख ८० हजार रुपये देतो आणि उद्या गाडी घेऊन जातो, असे सांगितले आणि गाडी घेण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.