शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

मैनुद्दीन मुल्लाच मुख्य सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:19 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारणानगर येथील कोट्यवधी रुपये चोरीप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या मैनुद्दीन मुल्ला याला अटक करण्यामध्ये ‘सीआयडी’ला अखेर यश आले. वारणेचे कोट्यवधींचे घबाड कोणाचे, चोरीच्या पैशांतील कोणी-कोणी किती वाटा घेतला... अशा अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट त्याच्या चौकशीमध्ये होणार आहे. वारणा चोरीचा मुख्य धागा ‘सीआयडी’च्या हाती लागल्याने ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारणानगर येथील कोट्यवधी रुपये चोरीप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या मैनुद्दीन मुल्ला याला अटक करण्यामध्ये ‘सीआयडी’ला अखेर यश आले. वारणेचे कोट्यवधींचे घबाड कोणाचे, चोरीच्या पैशांतील कोणी-कोणी किती वाटा घेतला... अशा अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट त्याच्या चौकशीमध्ये होणार आहे. वारणा चोरीचा मुख्य धागा ‘सीआयडी’च्या हाती लागल्याने सांगली-कोल्हापूर पोलिसांचे धाबे दणाणले आहे.वारणा शिक्षक कॉलनीतील साडेचार कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी १८ मार्च २०१६ रोजी मैनुद्दीन मुल्ला याला सांगली पोलिसांच्या ताब्यातून आपल्यां ताब्यात घेतले. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची २२ मार्च २०१६ रोजी बिंदू चौक कारागृहात रवानगी केली. तेथून तो जामिनावर बाहेर पडताच त्याने मित्र संशयित विनायक महादेव जाधव (३५, रा. भामटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याची भेट घेतली. त्याच्याकडे त्याने वारणानगर येथील चोरीमधील सुमारे ७० लाख रुपये ठेवण्यास दिले होते. त्याला दि. ३ जून २०१६ रोजी सायबर चौकात बोलावून त्याच्याकडून ६८ लाख रुपये घेऊन तो पसार झाला. त्याच्या शोधासाठी पुणे, मुंबई, बेळगाव, आदी ठिकाणी चार-पाच वेळा पथके पाठविली; परंतु ती रिकाम्या हातांनी परतली.मैनुद्दीनचे भाऊ कादर मुल्ला, आमीर मुल्ला, नबाब मुल्ला, बहीण जनक सूरज नागरजी हे सर्व जाखले गावी राहतात. पोलिसांचे घरी येणे, बांधकाम व्यावसायिकाच्या धमक्या या तणावाखाली मैनुद्दीनच्या आईचे ११ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले. तिच्या अंत्यविधीला मैनुद्दीन येईल, या आशेपोटी पोलिसांनी घरासभोवती खबरे व साध्या वेशात पोलीस ठेवले होते; परंतु पोलिसांच्या अटकेच्या भीतीने तो घरी फिरकलाच नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक त्याला शोधण्यामध्ये अपयशी ठरले आणि तब्बल दीड वर्षाने सीआयडीच्या हाती मैनुद्दीन लागला.त्याच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीत अनेक गौप्यस्फोट होणार आहेत. तो वारणा चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. तो हाती लागल्याने सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे.यांना झाली अटकसंशयित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, पोलीस हवालदार दीपक पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे , मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा), त्याचे साथीदार महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा), विनायक जाधव (रा. भामटे, ता. करवीर), संदीप बाबासाहेब तोरस्कर (रा. बापट कॅम्प, कोल्हापूर).अटकेच्या प्रतीक्षेतसंशयित कॉन्स्टेबल शंकर महादेव पाटील (५२, रा. महादेवनगर, सांगली), सहायक फौजदार शरद कुरळपकर, संशयित चंदनशिवेचा मित्र प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.रेहान अन्सारीचे सीआयडीसमोर आव्हानमैनुद्दीनचा साथीदार रेहान अन्सारी (रा. बिहार) हा फरार आहे. अन्सारी व विनायक जाधव अशा तिघांनी मिळून ही चोरी केली होती. या गुन्ह्णातील सर्व आरोपी सापडले; पण अन्सारीचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. तोही गायब आहे. मैनुद्दीन सापडला; आता अन्सारीचा शोध लावणे ‘सीआयडी’समोर आव्हान आहे.