शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण ‘हौसा’ला हवाय माणुसकीचा आसरा

By admin | Updated: April 29, 2016 00:52 IST

पुढाकाराची गरज : उदगावमध्ये पाच वर्षांपासून रस्त्यावरच संसार

संतोष बामणे - जयसिंगपूर--ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता गेल्या पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी आपला ठिय्या मांडून असलेली उदगाव-रोहिदासनगर (ता़ शिरोळ) येथील मनोरुग्ण हौसाबाई रस्त्याच्या कडेला आपला संसार मांडून बसलेली असते़ या परिसरात तिच्या नातेवाइकांचा गोतावळा असूनसुद्धा तिला असे जीवन जगावे लागत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे़ मात्र, तिच्या उपचारासाठी सामाजिक संस्थांबरोबर कोण पुढाकार घेऊन मदतीचा हात देण्यासाठी पुढे येईल का? हाच प्रश्न लागून राहिला आहे़येथील रोहिदास नगरमधील एका रस्त्याच्या कडेला भूपाल ठोमके यांच्या घरासमोरच गेल्या पाच वर्षांपासून ती राहत असून, तिच्याजवळ आपले साहित्य, स्वत:चा अवतार वेतारलेल्या अवस्थेत व डोक्यावर केस न विंचरल्यामुळे झालेला केसांचा गुंता अशा अवस्थेत कोण एकवेळचे जेवण देते किंवा नाही, असे जीवन जगत असताना माणुसकीच्या नात्याने एक-दोन वेळचा अन्नाचा घास गावातील व शेजारचे नागरिक देत आहेत़ मात्र, तिच्या जिव्हाळ्याच्या लोकांनी तिला टाकल्याचे दिसून येते़२००५ ला आपल्या आयुष्याच्या संसार तुटला़ तिच्या मागे मूल ना बाळ, अशा परिस्थितीत तिला एक मानसिक धक्का बसून ती मनोरुग्ण बनली. काही वेळा जुन्या आठवणींतून ती अश्रू ओंघाळत बसते़ सध्या राहत असलेल्या रस्त्यालगत परिसरातील जागा स्वच्छ ठेवते. मात्र, या पाच वर्षांत ऊन व पावसाची तमा न बाळगता रस्त्यावरच असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे तिच्याकडे लक्ष जाते़ मात्र, तिला उपचारासाठी दाखल करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही़ त्यामुळे तिला माणुसकीची गरज आहे़ उपचार करणे गरजेचे मनोरुग्ण हौसाला एक-दोन वेळचे जेवण माणुसकीच्या नात्याने काही नागरिक देतात, तर काही नागरिक फक्त तिला बघून पुढे निघून जातात़ अशा परिस्थितीत हौसाला सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मनोरुग्णाच्या उपचारासाठी पुढाकार घेऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे़ उदगाव (ता़ शिरोळ) येथील रोहिदास नगरमध्ये पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी राहणारी मनोरुग्ण हौसाबाई.