शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मानाच्या गणेशपुजनाने कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 11:28 IST

मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस झाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले.

ठळक मुद्दे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन डॉल्बी विरहीत मिरवणूक काढून इतिहास घडवण्याचे चंद्रकांतदादांचे आवाहनगाव तिथं निर्माल्य, विसर्जन कुंडदादांनी वाजविला ढोल...

कोल्हापूर, दि. ५ : मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस झाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले.

यावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, कोल्हापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहीते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर,शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. धनंजय पठाडे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार, लाला गायकवाड, माजी नगरसेवक आदील फरास, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, अनिल घाटगे, उद्योजक चंद्रकांत जाधव, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, नगरसेवक विजय सुर्यवंशी, विजय करजगार आदी उपस्थित होते.श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने परिसर दणाणून सोडला. फुलांनी सजविलेल्या पालखीचे पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील आदी मान्यवरांनी सारथ्य करत ही पालखी मिरजकर तिकटीपर्यंत वाहून नेली. यावेळी मिरजकर तिकटी येथे तुकाराम माळी तालीम मंडळाने देखाव्यात सादर केलेल्या कोल्हापूर -वैभववाडी या ‘अंबाबाई एक्सप्रेस ’ ला हिरवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले.इतिहास घडवा

गेले दहा बारा दिवस डॉल्बी विरहीत मिरवणूक काढण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यास अनुसरुन यंदाची कोल्हापूरसह राज्यभरातील गणेश विसर्जन मिरवणूक ‘न भूतो न भविष्यती’अशी होईल. यात महीलांसह बालकांचाही सहभाग असेल. कारण मंडळे यंदा कर्णकर्कश आवाजाचे डॉल्बीचे राक्षस मिरवणूकीत लावणार नाहीत आणि ते मंडळांनी लावू नयेत. यासाठी पर्यायी परंपारिक वाद्यांचा गजर चांगला आहे, त्याचा वापर करावा. डॉल्बीविरहीत मिरवणूक काढून राज्यात कोल्हापूरचे नाव होऊ दे आणि इतिहासही घडू दे, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.गाव तिथं निर्माल्य, विसर्जन कुंडमिरवणूकीच्या उदघाटनानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्याशी चर्चा करताना गायकवाड यांनी ‘ गाव तिथ निर्माल्य व गणेश विसर्जन कुंड’ अशी संकल्पना पालकमंत्र्यांसमोर मांडली. पाटील यांनी तत्काळ त्यास होकार देत गावे जर श्रमदानातून असे कुंड करणार असतील तर आम्ही त्यांना साहित्य पुरविण्यास तयार आहोत, असे सांगितले.दादांनी वाजविला ढोल...

डॉल्बीविरहीत मिरवणूकीच्या यशानंतर व मानाच्या ‘श्री ’ च्या पालखीचे सारथ्य केल्यानंतर चंद्रकांतदादांना ढोल ताशा पथकाच्या तडतडाटामुळे ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी काही काळ ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीचा आनंद व्यक्त केला.