शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईनसाठी तीन कंपन्या पात्र मनीष पवार : पुढील आठवड्यात चर्चेच्या फेर्‍या

By admin | Updated: May 16, 2014 00:44 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजनेसाठी काढलेल्या फेरनिविदा प्रक्रियेत देशपातळीवरील प्रतिसाद दिलेल्या तीनही कंपन्या पात्र ठरल्या आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजनेसाठी काढलेल्या फेरनिविदा प्रक्रियेत देशपातळीवरील प्रतिसाद दिलेल्या तीनही कंपन्या पात्र ठरल्या आहेत. आज, गुरुवारी महापालिकेत उघडलेल्या निविदेत लार्सन अ‍ॅँड टूब्रो लिमिटेडने २१.१० टक्के, जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडने १८.९ टक्के व मेघा इंजिनिअरिंगने २०.६५ टक्के निविदेपेक्षा जादा दराने टेंडर भरली आहेत. पुढील आठवड्यात आयुक्त कमी रकमेचे टेंडर भरलेल्या ‘जीकेसी’बरोबर चर्चा करतील, अशी माहिती जल अभियंता मनीष पवार यांनी दिली. शहरातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळावे म्हणून ४२३ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना राबविण्यात येत आहे. काळम्मावाडी योजनेला केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ योजनेतून मंजुरी मिळाली असून, ४२३.२२ कोटींच्या खर्चापैकी १७० कोटींचा निधीही राज्य सरकारकडे जमा झाला आहे. योजनेला मंजुरी मिळताच महानगरपालिका प्रशासनाने राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर निविदा प्रसिद्ध केली होती. तिला प्रतिसाद देत देशभरातील २५ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी निविदा पूर्वबैठकीला उपस्थिती लावली होती. मात्र, या योजनेसाठी पुढील तीन वर्षांतील किमान १०० कोटींचा येणारा जादा खर्च कोणी करायचा यावरून या कंपन्यांनी नकारघंटा दर्शविली. यावेळी जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडने सर्वांत कमी २७ टक्के जादा रकमेची निविदा भरली होती. मात्र, महापालिकेने पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसारा रक्कम देण्यास नकार दिला. दुसर्‍यांदा पुन्हा ३ मार्च २०१४ रोजी काढलेल्या निविदेत लार्सन अ‍ॅँड टूब्रो लिमिटेड (चेन्नई), जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेड (हैदराबाद), मेघा इंजिनिअरिंग (हैदराबाद) या कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. महापालिकेने तांत्रिक निविदांची छाननी केली. कंपन्यांची वार्षिक उलाढाल, तीन वर्षांतील कामाचा परफॉर्मन्स यांसह त्यांचे काम काढून घेण्याची कार्यवाही झाली आहे का, कोणत्या संस्थेने त्यांच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केली आहे का, त्यांनी घेतलेली कोणती योजना मागच्या तीन वर्षांत विफल झाली आहे का, आदी माहिती घेऊन दुसरी वित्तविषयक निविदा उघडण्यात आली. आता कमी रकमेच्या निविदा आलेल्या जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडबरोबर आणखी दर कमी होण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)