शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

आंब्याची आवक; डाळींचा ‘भाव’ चढाच

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

आठवडी बाजार : भुईमूग शेंगांची आवक, साखरेच्या दरातही वाढ

कोल्हापूर : शहरातील बाजारात रविवारी भुईमुगाच्या शेंगा दाखल झाल्या. शेंगाचा प्रतिकिलो दर ४० रुपये इतका होता. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या साहित्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. तसेच डाळींचे दर कडाडले असून आंब्यांची आवक वाढली आहे.बाजारात डाळींचे दर कडाडले आहेत. प्रतिकिलो तूरडाळ १२० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये, उडीदडाळ ९५ वरून ११० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तब्बल १५ रुपयांनी उडीदडाळ वाढली आहे. जिरे २२०, तर साखर २६ रुपयांवरून ती २८ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर भाज्यांमध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, कारली, भेंडीचे दर स्थिर आहेत. मात्र, गवारच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे ती ७० रुपये झाली आहे. कोथिंबीरची आवक कमी व मागणी वाढल्याने पेंढीचा दर सात रुपये झाला आहे, तर मेथी दहा ते १५ रुपयांच्या घरात गेली आहे. घाऊक बाजारात किलोमागे दोन रुपयांनी बटाटा वाढून त्याचा दर १२ रुपये झाला आहे.सरकीत दुसऱ्यांदा वाढ...या महिन्यात सरकी तेलाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. गत आठवड्यात ६६ रुपयांवरून ६८ रुपयांवर तर सध्या ७० रुपये प्रतिकिलो इतका दर आहे. जिऱ्यात वाढ; तीळ उतरलाबाजारात जिऱ्याच्या दरात तब्बल प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली आहे. जिऱ्याचा दर ३०० रुपये झाला आहे. मात्र, तिळाचा दर २० रुपयांनी घसरून तो १४० रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याचबरोबर विशेषत: चटणीसाठी लागणारे वाळलेले खोबऱ्याचा दर १६० रुपये प्रतिकिलो रुपये असा स्थिर आहे. आंब्यावर नजर...प्रकाररुपयेहापूस (पेटी)3000हापूस (बॉक्स)१२०० पायरी (बॉक्स)५५० लालबाग(बॉक्स)१६०तोतापुरी (टन)२०000मद्रास हापूस (बॉक्स)७०० मद्रास पायरी (बॉक्स)३५० लालबागचे आगमन...बाजारात रत्नागिरी, देवगड हापूस व पायरी आंब्याबरोबर आता गुजरातच्या लालबाग आंब्याचे आगमन झाले आहे. लालबाग आंब्याचा (बॉक्स)चा दर १६० रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांची लालबाग आंबा घेण्यासाठी गर्दी वाढली आहे.