शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

बंडात उठाव करणारा मानसिंग दुर्लक्षितच !

By admin | Updated: September 8, 2015 21:55 IST

फाशीचा वड : ‘जिज्ञासा’ने जागविल्या आठवणी

सातारा : १८५७ चे बंड म्हणजे भारतीय स्वातंत्रलढ्यातील एक महत्त्वाचे पर्व आहे. याचे कारण म्हणजे या क्रांतीत सहभागी असणाऱ्या १७ क्रांतिवीरांना जुलमी ब्रिटिश सरकारने मृत्युदंड दिला. तो दिवस होता ८ सप्टेंबर. येथील फाशीचा वड येथे जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या वतीने हुतात्म्यांना अभिवान करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.या शहिदांची स्मृती चिरकाल रहावी म्हणून स्वातंत्रोत्तर काळात गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे स्मारकही उभारण्यात आले आहे. वेळोवेळी त्या स्मारकाचे नूतनीकरणही करण्यात आले; परंतु ८ सप्टेंबर हा क्रांती दिवस मात्र विस्मृतीत गेल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.या क्रांतिकारकांमध्ये सर्व जातीचे लोक होते. आपल्या धेय्यासाठी जातिभेद विसरून त्यांनी मृत्यूला कवटाळले. या क्रांतिकारकांच्या नावांत, वेगवेगळ्या साधनांत मतांतरे अढळतात, त्यामुळे अस्सल साधनांचा अभ्यास करुन मूळ नावांचा शोध घेण्याचा मनोदय ‘जिज्ञासा’तील अभ्यासकांनी व्यक्त केला. शहिदांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी जिज्ञासाचे विक्रांत मंडपे, सागर गायकवाड, योगेश चौकवाले, नीलेश पंडित, शीतल दीक्षित तसेच नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्मारकावर हवा  नामोल्लेख..१८५७च्या बंडासाठी इंग्रजांची २२ वी पलटण फितूर करण्याची महत्त्वाची कामगिरी करणारा मानसिंग हाही एक क्रांतिकारक होता. जो फितुरीमुळे पकडला गेला व ताबडतोब १२ जून रोजी त्याल्या तोफेच्या तोंडी दिले गेले. परंतु कोणत्याही स्मारकावर त्याचा साधा नामोल्लेखही नाही, अशी खंत ‘जिज्ञासा’चे मार्गदर्शक गणपतराव साळुंखे यांनी व्यक्त केली. असा दिला होता मृत्युदंडबंडातील नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी (वाकनीस), सीताराम गुप्ते यांना फाशी देण्यात आले. तसेच मुनाजी भांदिर्गे, सखाराम शेट्ये, बाब्या गायकवाड, येषां गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाब्या शिरतोडे, नाम्या रामोशी, शिवाजी पाटोळे, पर्वती पाटोळे, पतालू येसू यांना गोळ्या घातल्या. गेंडामाळावरील फाशीचा वड येथे ही शिक्षा ठोठावण्यात आली. मृत्यूची शिक्षा देताना असा भेदभाव का हे न उलगडलेले कोडे आहे.